महिला हॉकी संघाच्या पराभवानंतर वंदना कटारियाच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ; घराबाहेर फोडले फटाके

खूप दलित खेळाडू असल्यामुळे संघ हरला असे म्हटल्याचे वंदनाच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे

Firecrackers burst outside Vandana Kataria house after the women hockey team lost youth detained

भारतीय पुरष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक पटकावलं आहे. आता सर्वांचे लक्ष महिला हॉकी संघाकडे लागले आहे. उपांत्य फेरीत महिला संघाचा पराभव जरी झाला असला तरी संपूर्ण भारत देश त्यांच्या आतापर्यंत खेळाचं कौतुक करत आहे. या सर्वादरम्यान, भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू वंदना कटारियाच्या कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये, संपूर्ण देश उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत असताना, संघाच्या पराभवानंतर हरिद्वारमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. रोशनबादमध्ये हरिद्वारच्या वंदना कटारियाच्या घराबाहेर काही लोकांनी फटाके फोडल्याचा आणि वंदनाच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप केला आहे. खूप दलित खेळाडू असल्यामुळे संघ हरला असेही त्यांनी म्हटल्याचे वंदनाच्या कुटुंबाने टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.

वंदनाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की काही तरुणांनी त्यांच्या घराबाहेर फटाके फोडले. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. वंदनाच्या कुटुंबीयांनी युवकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जर आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला नाही तर आम्ही आत्महत्या करु असे कुटुंबियांनी म्हटले आहे.

रोशनबाद गावात राहणारी वंदना कटारिया भारतीय महिला हॉकी संघात खेळत आहे. वंदनाने फक्त उपांत्यपूर्व सामन्यात हॅटट्रिक मारून भारतीय संघाला केवळ उपांत्य फेरीत नेले नाही, तर ती ऑलिम्पिकमध्ये हॅटट्रिक करणारी पहिला खेळाडू ठरली आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाने अर्जेंटिना संघाला पूर्ण ताकदीने लढत दिली. खडतर सामन्यात भारताचा संघाचा २-१ ने पराभूत झाला.

वंदनाचे भाऊ सौरभ कटारिया आणि पंकज कटारिया यांनी सांगितले की, काही तरुणांनी भारतीय संघ पराभूत होताच त्यांच्या घराबाहेर फटाके फोडण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून ते बाहेर आले आणि त्यांनी तरुणांना फटाके न फोडण्याची विनंती केली. त्यावेळी तरुणांनी शिवीगाळ सुरू केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Firecrackers burst outside vandana kataria house after the women hockey team lost youth detained abn

ताज्या बातम्या