scorecardresearch

भारत-आफ्रिका एकदिवसीय मालिका : चौथ्या क्रमांकासाठी मुंबईकरांमध्ये चुरस

उभय संघांत बुधवारी पर्ल येथील बोलंड पार्कवर पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येईल.

पर्ल : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या मुंबईकरांपैकी कुणाला प्राधान्य मिळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

उभय संघांत बुधवारी पर्ल येथील बोलंड पार्कवर पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येईल. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत छाप पाडण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुलच्या साथीने अनुभवी शिखर धवन सलामीला येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळणार का, हे पाहणेही रंजक ठरेल. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

चौथ्या स्थानासाठी सध्या श्रेयसचे पारडे जड मानले जात आहे. श्रेयसला २०१८च्या आफ्रिका दौऱ्याचाही अनुभव आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First odi india against south africa shreyas iyer suryakumar yadav zws

ताज्या बातम्या