scorecardresearch

आधी गर्लफ्रेंडकडून खाल्ले फटके अन् आता चप्पल-बूट कंपनीने…, ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्कला लागला कोट्यावधींचा चुना

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्कचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यासोबत काम करण्याचा कुठलाही इऱादा नाहीय, हे ऑस्ट्रेलियन ब्रँडने स्पष्ट केलय. आधी त्याच्या इमेजच नुकसान झालं. आता त्याचं कोट्यवधी रुपयांच नुकसान झालं.

michael clarke
मायकेल क्लार्क

Michael Clarke girlfriend: गर्लफ्रेंडकडून झालेल्या मारहाणीमुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधी त्यांची प्रतिमा खराब झाली आणि आता त्यांचे करोडोंचे नुकसान झाले आहे. नुकताच क्लार्कचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. यारब्रोने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शूज आणि चप्पल बनवणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीने क्लार्कसोबत काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पादत्राणे आणि कपड्यांच्या एका प्रमुख ब्रँडने क्लार्कपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रँडने पुष्टी केली आहे की तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्लार्कसोबत काम करण्याचा कोणताही हेतू नाही. ऑस्ट्रेलियाच्या सुप्रसिद्ध ब्रँडने सांगितले की, क्लार्कशी त्यांचे नाते गेल्या वर्षी सुरू झाले आणि गेल्या वर्षीच संपले आणि आता या वादानंतर हे नाते पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.

गर्लफ्रेंडने का केली मारहाण?

मायकल क्लार्क आणि त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो यांच्यात जे घडलं त्याचा नेमका प्रकार काय घडला हे सविस्तर समजू शकले नव्हते. पण एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये जेड यारब्रोने क्लार्कला बेदम मारले. यारब्रोने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर चप्पल निर्मिती करणाऱ्या कंपनीनेही त्याला चांगलाच धक्का दिला.

एकदा क्लार्कबरोबर काम केले

त्यांच्या ब्रँडने क्लार्कसोबत फक्त एकदाच काम केले आहे, कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला त्याच्यासोबत फादर्स डे शूट केले होते, असे निवेदनात म्हटले आहे. आता हा ब्रँड भविष्यात पुन्हा कधीही क्लार्कसोबत काम करणार नाही. त्यामुळे भविष्यात क्लार्कचा या ब्रँडसोबत करोडोंचा करार होण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे.

बीसीसीआयही पावले उचलू शकते

इतकेच नाही तर क्लार्कला भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या कॉमेंट्री पॅनलमधूनही वगळले जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. बीसीसीआयने कॉमेंट्री पॅनलसाठी माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराशी करार केला होता, परंतु आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोर्डाने त्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे झाल्यास त्याला सुमारे ८२ लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते.

हेही वाचा: IND vs AUS: भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात उडाली खळबळ; बोर्डाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक, कर्णधार पॅट कमिन्स वादाच्या भोवऱ्यात

माजी मैत्रिणीसोबत भारतात जाण्याचा विचार करत आहे

पूर्वी, क्लार्क त्याची प्रेयसी, तिची बहीण आणि पतीसोबत सुट्टीवर गेला होता, जिथे गर्लफ्रेंडने त्याला मारहाण केली आणि आरोप केला की तो त्याच्या माजी गर्लफ्रेंड पिप एडवर्डसला भेटला होता आणि तिच्यासोबत भारताला भेट देण्याचा विचार करत होता. जेड यारब्रोच्या बहिणीने हे प्रकरण हाताळण्यासाठी त्याला खेचले, परंतु भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्लार्क स्वतःला अडचणीत सापडला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 15:05 IST