लीग-१ फुटबॉल : मेसीच्या गोलमुळे पॅरिस सेंट-जर्मेनची सरशी

आघाडीपटू लिओनेल मेसीच्या गोलमुळे पॅरिस सेंट-जर्मेनने लीग-१ फुटबॉलच्या सामन्यात नोंटवर ३-१ अशी सरशी साधली. हा मेसीचा फ्रेंच लीगमधील पहिलाच गोल ठरला.

पॅरिस : आघाडीपटू लिओनेल मेसीच्या गोलमुळे पॅरिस सेंट-जर्मेनने लीग-१ फुटबॉलच्या सामन्यात नोंटवर ३-१ अशी सरशी साधली. हा मेसीचा फ्रेंच लीगमधील पहिलाच गोल ठरला.

या सामन्यात पॅरिसने आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्याच मिनिटाला किलियान एम्बापेने गोल करत पॅरिसला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात रांदेल कोलो मौनीने (७६वे मिनिट) गोल केल्याने नोंटने सामन्यात बरोबरी साधली. मात्र, आधी डेनिस अपीयाचा स्वयंगोल (८१वे मि.) आणि मग मेसीच्या (८७वे मि.) गोलमुळे पॅरिसने सामना ३-१ असा जिंकला. त्यांचा हा १४ सामन्यांत १२वा विजय ठरला.

सेरी ए फुटबॉल स्पर्धा : इब्राहिमोव्हिचच्या गोलनंतरही मिलान पराभूत

मिलान : झ्लाटान इब्राहिमोव्हिचच्या दुहेरी गोलधडाक्यानंतरही एसी मिलानला सेरी ए फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. फिओरेंटिनाने त्यांच्यावर ४-३ अशी मात केली. फिओरेंटिनाचे गोल अल्फ्रेड डंकन (१५वे मि.), रिकाडरे सापोनारा (४५ १वे मि.) आणि डूसान व्लाहोव्हिच (६० आणि ८५वे मि.) यांनी केले. इब्राहिमोव्हिचने उत्तरार्धात दोन गोल केले, पण ते मिलानला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

प्रीमियर लीग फुटबॉल : लिव्हरपूल, चेल्सीचे मोठे विजय

लंडन : लिव्हरपूल आणि चेल्सी या संघांनी इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये मोठय़ा विजयांची नोंद केली. लिव्हरपूलने आर्सेनलचा ४-० असा पराभव केला. त्यांच्याकडून साडिओ माने (३९वे मि.), दिओगो जोटा (५२वे मि.), मोहम्मद सलाह (७३वे मि.) आणि मिनामिनो (७७वे मि.) यांनी गोल केले. अँटोनियो रुडिगा (१४वे मि.), एनगोलो कांटे (२८वे मि.) आणि ख्रिस्टियन पुलिसिक (७१वे मि.) यांच्या गोलमुळे चेल्सीने लिस्टर सिटीवर ३-० अशी मात केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Football messi goal paris saint germain lead ysh

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या