Brazil Football Player Pele Died at 82: सर्वकालीक महान फुटबॉलपटू पेले यांचं आज ८२व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. पण पेलेंनी त्यांच्या आयुष्यात निर्माण केलेली त्यांची प्रतिमा आजीवन चाहत्यांच्या आणि फुटबॉल प्रेमींच्या मनावर कोरली गेल्याची भावना फुटबॉल विश्वातून व्यक्त केली जात आहे. पेलेंची महत्ता आणि त्यांनी फुटबॉल प्रेमींच्या मनावर खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवल्याचे अनेक प्रसंग सांगितले जातात. त्यातलाच एक प्रसंग होता १८ जून १९६८ रोजी झालेल्या ‘त्या’ सामन्यातला!

पेलेंनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९५६ साली सॅन्टोस क्लबपासून केली. त्यानंतर सॅन्टोस क्लबसाठी त्यांनी तब्बल ९ वेळा साओ पावलो लीग स्पर्धा जिंकली. त्यानंतर १९६२ मध्ये लिबर्टाडोरेस कप आणि १९६३ मध्ये इंटरकॉन्टिनेन्टल क्लब कप या स्पर्धाही जिंकल्या. पण पेले यांना कधीच युरोपियन क्लबकडून फुटबॉल खेळता आलं नाही. ब्राझील सरकारकडून त्यांनी देशाबाहेर जाण्यावर आडकाठी आणली जात होती. फक्त कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात १९७५ साली त्यांनी ‘न्यूयॉर्क कॉसमॉस’ या एकमेव परदेशी क्लबकडून सामने खेळले.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
thane theft news, jewellery theft thane marathi news
सुट्टी घेतल्यामुळे सेल्समनची चोरी उघड, १ कोटी ५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; नौपाडा पोलिसांनी केली सेल्समनला अटक
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

दुःखद बातमी ! ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे ८२ व्या वर्षी कॅन्सरने निधन

तीन विश्वचषक विजेत्या संघात खेळणारे एकमेव खेळाडू!

जगभरात फुटबॉलचे असंख्य चाहते आहेत. फुटबॉल विश्वचषक म्हणजे या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच! असे तीन फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या संघातून खेळणारे पेले हे इतिहासातले एकमेव फुटबॉलपटू होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकून १४ विश्वचषक सामन्यांमध्ये १२ गोल गेले. पेलेंच्या नावाने प्रसिद्ध झालेली ‘बायसिकल किक’ अजूनही अनेक फुटबॉलपटूंसाठी आणि चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरते.

Pele: पेलेंना ब्राझीलबाहेर खेळण्याची परवानगी नव्हती? युरोपियन क्लबकडून का खेळू शकले नाहीत पेले?

…आणि ‘त्या’ वादानंतर पंचच मैदान सोडून निघून गेले!

फुटबॉल चाहत्यांच्या मनावर पेलेंनी कशा प्रकारे गारूड केलं होतं, यासाठी एक किस्सा नेहमीच सांगितला जातो. सॅण्टोस विरुद्ध कोलंबियन ऑलिम्पिक संघ असा सामना १८ जून १९६८ रोजी सुरु होता, तेव्हाची गोष्ट : पंच गुईलेर्मो यांनी पेले फाऊल असल्याचा निर्णय दिला. तेव्हा त्यांची पंचांशी वादावादी झाली. पंचांशी हुज्जत घातल्यामुळे पेलेंना पंचांनी पेलेला मैदानाबाहेर काढले. तेव्हा उपस्थित प्रेक्षकांना हा निर्णय रुचला नाही. त्यांनी इतका गोंधळ घातला की शेवटी पंच गुईलेर्मो यांनी पेलेंना मैदानात बोलावले आणि आपली शिटी लाइनमनला देऊन ते स्वतः मैदानाबाहेर गेले!

विश्लेषण: पेले… फुटबॉलमधील अद्भुत दंतकथा!

सॅण्टोस संघाचा १९६७ मधील नायजेरिया दौरा म्हणजे पेलेंच्या लोकप्रियतेचा कळस होता. तेव्हा नायजेरियात यादवी सुरू होती. पण पेलेंना पाहण्यासाठी चक्क ४८ तासांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता!