वृत्तसंस्था, दोहा : कतार येथे सुरू असलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली. विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेटिनाच्या संघाला आशियाई संघ सौदी अरेबियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. मध्यंतराच्या एका गोलच्या पिछाडीनंतरही उत्तरार्धात सालेह अलशेरी आणि सालेम अलडावसारी यांनी पाच मिनिटांच्या अंतराने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर सौदी अरेबियाने त्यांच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा विजय साकारला. सहाव्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सौदी अरेबियाला यापूर्वीच्या पाच स्पर्धामध्ये एकही सामना जिंकता आला नव्हता. हा अपयशाचा डाग सौदी अरेबियाने अखेर खोडून काढला.

अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीने चार विश्वचषक स्पर्धामध्ये गोल करण्याची किमया या वेळी साधली खरी, पण तो संघाला विजयी करू शकला नाही. सामन्याच्या दहाव्याच मिनिटाला मेसीने पेनल्टीच्या साहाय्याने गोल करून अर्जेटिनाला आघाडीवर नेले होते. मध्यंतरापर्यंत अर्जेटिनाला आघाडी राखण्यात यश आले. मात्र, उत्तरार्धात पाच मिनिटांच्या अंतराने सौदी अरेबियाने दोन गोल करून सनसनाटी निर्माण केली. सामन्याच्या ४८व्या मिनिटाला अगदी मैदानालगत किक मारून शेरीने गोलजाळीचा अचूक वेध घेतला. बरोबरीनंतर प्रेरित झालेल्या सौदी अरेबियाच्या आक्रमणांना वेगळीच धार आली आणि ५३व्या मिनिटाला गोलकक्षाच्या रेषेवरून डावसारीने गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. या गोलनंतर स्टेडियमवर काही काळ शांतता पसरली. अर्जेटिनाला यानंतर पुनरागमन करता आले नाही.

candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Shikhar Dhawan's Shoulder Injury Updates in Marathi
Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Shanshak Singh Performance in IPL 2024
IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम, ५ डावात फक्त एकदाच झालाय आऊट

सामन्याच्या सुरुवातीलाच गोल करून अर्जेटिनाने झकास सुरुवात केली होती. अर्जेटिनाने वर्चस्व राखले होते. त्यांच्या आक्रमणांनी सौदी अरेबियाच्या मध्यरक्षक आणि बचावफळीची कसोटी पाहिली होती. अर्जेटिनाचा गोलधडाका सुरू राहील असेच काहीसे चित्र वाटले. पण, अर्जेटिनाचे तीन गोल अपात्र ठरविण्यात आले आणि हा सर्वात मोठा फरक या निर्णयात महत्त्वाचा ठरला. उत्तरार्धात एका गोलच्या पिछाडीवर राहिल्यानंतरही अर्जेटिनाने चेंडूवरील सर्वाधिक नियंत्रण राखले होते. मात्र, त्यांना सौदीचा बचाव भेदता आला नाही.

सलग ३६ विजयांची मालिका खंडित

सौदीविरुद्धच्या पराभवाने अर्जेटिनाची सलग ३६ सामन्यांत अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली. या पराभवाने १९९०च्या विश्वचषक स्पर्धेच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा मॅराडोनाच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाला कॅमेरूनकडून १-० असा पराभव पत्करावा लागला होता. आता अर्जेटिना आणि सौदी अरेबियासमोर उर्वरित दोन साखळी सामन्यांत मेक्सिको आणि पोलंड या संघांचे आव्हान असेल. पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे अर्जेटिनाला आता आव्हान टिकविण्यासाठी नव्या नियोजनाने खेळावे लागेल. तर, सौदीला सातत्य राखावे लागेल. सौदी अरेबियाने बलाढय़ अर्जेटिनाचा पराभव करून सनसनाटी निर्माण केली. एखाद्या विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात तुलनेने दुबळय़ा संघाकडून बलाढय़ प्रतिस्पर्धी पराभूत होण्याची ही तिसरी घटना ठरली. यापूर्वी २००२ मध्ये सेनेगलने आधीच्या स्पर्धेतील विजेत्या फ्रान्सचा १-० असा पराभव केला होता. त्यापूर्वी १९५० मध्ये अमेरिकेने इंग्लंडला १-० अशाच फरकाने पराभूत केले होते.