scorecardresearch

Brett Lee ने अर्शदीप सिंगला दिला महत्वाचा सल्ला; म्हणाला, ‘त्याने जिममध्ये…’

Brett Lee on Arshdeep Singh: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगसाठी २०२३ ची सुरुवात चांगली राहिली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने नो-बॉलचा विक्रम केला आहे. दरम्यान, या प्रकरणाला पुन्हा हवा देताना ब्रेट लीने मोठी गोष्ट सांगितली आहे.

Brett Lee ने अर्शदीप सिंगला दिला महत्वाचा सल्ला; म्हणाला, ‘त्याने जिममध्ये…’
अर्शदीप सिंग आणि ब्रेट ली (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

टी-२० विश्वचषक गमावल्यानंतर टीम इंडियाने नवीन वर्षाची शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी-२० मालिकेत श्रीलंकन ​​संघाचा २-१ असा पराभव केला होता. त्यानंतर वनडे मालिकाही आपल्या नावावर केली. पण टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीपसाठी नवीन वर्षाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अर्शदीपने एकापाठोपाठ एक नो बॉल टाकून सर्वांनाच चकित केले. आता माजी क्रिकेटपटू ब्रेटलीने अर्शदीपबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

नो बॉलबद्दल यूट्यूब चॅनलवर बोलताना ब्रेट ली म्हणाला, ”नो बॉल हा गोलंदाजाचा सर्वात मोठा शत्रू असतो. कारण तुम्हाला फक्त अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो असे नाही, तर फलंदाजाला हवे ते करण्याचा परवानाही मिळतो. हे गोलंदाजाच्या हृदयात वार करण्यासारखे आहे. गोलंदाजाला ते मिळाले तर तो जादू करू शकतो, पण एकदा लय गमावली की तो तुम्हाला खूप मागे टाकतो.”

वास्तविक, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली असे मानतो की काहीवेळा खूप सल्ला देणे चांगले नसते. हे अर्शदीप सिंगलाही लागू होते. या युवा वेगवान गोलंदाजाला जास्त सल्ले देणे टाळावे लागणार आहे. तो म्हणाला की मला आशा आहे की भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळतील.

तसेच अर्शदीप सिंगने जिममध्ये जास्त वेळ घालवू नये असे ब्रेट लीचे मत आहे. विशेषत: या वेळी जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जास्त जिमला धोकादायक मानतो. ते टाळण्याचा सल्ला त्यांने अर्शदीप सिंगला दिला आहे.
ब्रेट लीने जसप्रीत बुमराह आणि दीपक चहरसारख्या गोलंदाजांचे उदाहरण दिले. दोन्ही खेळाडूंना जिम आणि वर्कआऊटमुळे दुखापतीचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अर्शदीप सिंगने ते टाळावे असेही तो म्हणाला.

हेही वाचा – IND vs NZ 3rd ODI सामन्याच्या तिकिटांच्या काळ्याबाजारावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; म्हणाले,’तिकिट विक्रीमध्ये…’

ब्रेट लीचा असा विश्वास आहे की, अर्शदीप सिंग जास्त कसरत न करताही चमकदार गोलंदाजी करू शकतो. तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. ब्रेट ली पुढे म्हणाला की, एक वेगवान गोलंदाज असल्याने लोक अर्शदीप सिंगला जिममध्ये जाण्याचा सल्ला देतील, परंतु मला विश्वास आहे की तो जिममध्ये न जाताही चांगली कामगिरी करेल. त्यामुळे त्याने ते टाळले पाहिजे.

हेही वाचा – Mumbai vs Delhi Ranji Trophy: सरफराज खानची शतकी खेळी व्यर्थ; ४२ वर्षांत प्रथमच दिल्लीने मुंबईला चारली धूळ

अर्शदीप सिंगने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. या युवा वेगवान गोलंदाजासाठी हे वर्ष छान गेले. अर्शदीप सिंगने टी-२० व्यतिरिक्त वनडे फॉरमॅटमध्येही आपली छाप सोडली आहे. विशेषत: जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत या गोलंदाजाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्शदीप सिंगने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत २३ सामन्यात ३३ विकेट घेतल्या आहेत. नवीन चेंडूंशिवाय या गोलंदाजाने डेथ ओव्हर्समध्येही उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 17:39 IST

संबंधित बातम्या