ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा ‘गंभीर’ अपघात; मुलासोबत बाईक चालवताना…

अपघातानंतर वॉर्नला पाय किंवा नितंब मोडले जाण्याची भीती वाटत होती.

Former australia spinner shane warne has injured himself in a motorbike accident
शेन वॉर्न आणि मुलगा जॅक्सनचा बाईक अपघात

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्नचा अपघात झाला आहे. वॉर्न आपला मुलगा जॅक्सनला घेऊन बाईक चालवत होता. त्यावेळी हा अपघात झाला. अपघातावेळी वॉर्नची बाईक १५ मीटरपेक्षा जास्त घसरत गेली. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या बातमीनुसार, वॉर्नला गंभीर दुखापत झाली आहे. ”मला दुखापत झाली असून खूप वेदनाही होत आहेत”, असे वॉर्नने अपघातानंतर म्हटले.

अपघातानंतर ५२ वर्षीय वॉर्न रुग्णालयात गेला. वॉर्नला पाय किंवा नितंब मोडले जाण्याची भीती वाटत होती. ८ डिसेंबरपासून गाबा येथे सुरू होणार्‍या ऍशेस मालिकेत समालोचन करण्यासाठी वॉर्न पुमरागमन करेल, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे.

हेही वाचा – तुरुंगात गेलेला भारतीय क्रिकेटर IPL 2022 खेळणार?; कोणत्या संघात जाणार याबाबत उत्सुकता!

काही दिवसांपूर्वी शेन वॉर्न पुन्हा एकदा एका मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री जेसिका पॉवरला अश्लील मेसेज पाठवल्याच्या आरोपामुळे वादात सापडला होता. जेसिकाने वॉर्नच्या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये वॉर्नने त्याला हॉटेलच्या रूममध्ये भेटण्यास सांगितले होते. ऑस्ट्रेलियन मॉडेल एली गोन्साल्विस आणि इमोजेन अँथनी यांनीही शेन वॉर्नवर माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप केला होता.

काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स या प्रकरणी चर्चेत राहिले. सेक्सटिंग प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेनला कर्णधारपद सोडावे लागले आणि त्यानंतर त्याला क्रिकेटमधून ब्रेकही घ्यावा लागला. पेनच्या जागी पॅट कमिन्सची नुकतीच ऑस्ट्रेलियाचा पुढील कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. कमिन्सला वॉर्ननेही पाठिंबा दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former australia spinner shane warne has injured himself in a motorbike accident adn

ताज्या बातम्या