भारताचा भरवशाचा फलंदाज विराट कोहलीच्या खेळाचे कपिल देव, वासीम अक्रम व सौरव गांगुली या महान क्रिकेटपटूंनी भरभरून कौतुक केले आहे. कोहलीची त्यांनी अव्वल दर्जाचा फलंदाज जावेद मियाँदाद व महान टेनिसपटू जॉन मॅकेन्रोशी तुलना केली.

‘‘भारतीय संघातील अतिशय महत्त्वाचा खेळाडू म्हणून कोहलीचे स्थान आहे. संघात रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराज सिंग यांच्यासारखे अव्वल दर्जाचे खेळाडू असले तरी कोहली हा त्यांच्यापेक्षाही दिग्गज खेळाडू आहे. त्याने जगातील अनेक मैदाने गाजविली आहेत व संघास विजय मिळवून देणारा खेळाडू म्हणून त्याचा नावलौकिक आहे,’’ असे गांगुलीने सांगितले.