scorecardresearch

Michael Vaughan: मायकल वॉनचा वनवास संपला! बारा वर्षांनंतर ‘या’ गंभीर आरोपातून झाली मुक्तता

Racism Allegations: माजी क्रिकेटर मायकल वॉनची वर्णद्वेषाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. १२ वर्षांपूर्वी यॉर्कशायरकडून क्रिकेट खेळत असताना त्याच्यावर आरोप झाले होते

Racism Allegations on Michael Vaughan
मायकल वॉन (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

Michael Vaughan racism charge: इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनवरील वर्णद्वेषाचे आरोप फेटाळण्यात आले आहेत. शिस्तपालन समितीने त्याच्यावरील वर्णद्वेषाचे आरोप फेटाळून लावले आहेत. २००९ मध्ये यॉर्कशायर संघात समाविष्ट असलेल्या आशियाई वंशाच्या खेळाडूंच्या गटावर वांशिक टिप्पणी केल्याचा आरोप या दिग्गजावर करण्यात आला होता. या प्रकरणात वॉनला १२ वर्षांनंतर दिलासा मिळाला आहे.

मायकल वॉनने दिली माहिती –

मायकेल वॉनने आज, (३१ मार्च २०२३ रोजी) स्वतः ट्विट करुन माहिती देताना सांगितले की, ‘इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन आयोगाने त्याला वर्णद्वेषी आणि भेदभावपूर्ण भाषा वापरल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे.’ या प्रकरणाची लंडनमध्ये सुनावणी तीन सदस्यीय समितीसोबत झाली. पॅनेलने आपला निकाल जाहीर करताना वॉनची निर्दोष मुक्तता केली आहे.

या खेळाडूंनी मायकेल वॉनवर आरोप केले होते –

खरं तर, २००९ मध्ये अझीम रफिकने मायकल वॉनवर वर्णद्वेषाचा आरोप केला होता, तेव्हा मायकल वॉन यॉर्कशायरकडून क्रिकेट खेळत होता. अझीमशिवाय आदिल रशीद, राणा नावेद-उल-हसन आणि अजमल शहजाद यांनीही वॉनवर वर्णद्वेषाचा आरोप केला होता. यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार वॉनने आपल्यावरील आरोप आणि केलेल्या वादग्रस्त ट्विटबद्दल माफी मागितली होती. वॉनने कबूल केले की, केसच्या सुनावणीदरम्यान ईसीबीचे प्रमुख वकील जेन मुल्काही केसी यांनी जवळपास ९० मिनिटे चौकशी केली, तेव्हा त्याचे ट्विट अस्वीकार्य होते. दरम्यान, वॉनने या ट्विटबद्दल माफी मागितली होती.

हेही वाचा – IPL 2023 Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सला मिळाला जसप्रीत बुमराहचा बदली खेळाडू; ‘हा’ गोलंदाज घेणार स्टार खेळाडूची जागा

संपूर्ण प्रकरण काय होते –

क्रिकेटर अझीम रफिकने मायकेल वॉनवर आरोप केला होता की, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने टी-२० सामन्यादरम्यान त्याला आणि इतर आशियाई वंशाच्या खेळाडूंना लक्ष्य केले होते. त्याचबरोबर माजी कर्णधार म्हणाला होता की, “तुमच्या लोकांची संख्या खूप वाढली आहे, आम्हाला यावर काहीतरी करण्याची गरज आहे.”

वास्तविक, मायकेल वॉनने १५ ऑक्टोबर २०१० रोजी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘लंडनमध्ये फारसे इंग्लिश लोक राहत नाहीत, मला नवीन भाषा शिकण्याची गरज आहे.’ या ट्विटसाठी वॉनची निंदा करण्यात आली होती, ज्याचा संबंध वर्णद्वेषाशी जोडला जात होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 18:23 IST

संबंधित बातम्या