scorecardresearch

माजी क्रिकेटपटू राहुल मंकड यांचे निधन

१९७८-७९च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यातही त्यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.

पीटीआय, मुंबई

मुंबईचे माजी फलंदाज राहुल मंकड यांचे बुधवारी बुधवारी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी निशिता, दोन मुली असा परिवार आहे.माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांच्या तीन मुलांपैकी राहुल हे सर्वात लहान होते. हे तिघेही प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. सलामीवीर राहुल यांनी १९७२-७३ ते १९८४-८५ या कालावधीतील ४७ सामन्यांत ३५.७७च्या सरासरीने एकूण २१११ धावा केल्या. यात पाच शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश होता. रणजी विजेत्या मुंबईच्या संघात ते चार वेळा सदस्य होते. याशिवाय १९७८-७९च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यातही त्यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former cricketer rahul mankad dies zws

ताज्या बातम्या