भारत आणि पाकिस्तान यापुढे द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येणार नाहीत. म्हणूनच दोन्ही देशांचे चाहते आयसीसी स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेणेकरून ते एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये २४ ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढत होईल. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनिसने या सामन्यारपूर्वी एक प्रतिक्रिया देत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनडे विश्वचषकाप्रमाणेच पाकिस्तानला टी-२० विश्वचषकात आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी भारतावर कधीही विजय मिळवता आलेला नाही. २००७ मध्ये झालेल्या स्पर्धेत दोन्ही संघांमधील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, परंतु भारताने पाकिस्तानला बॉल-आउटमध्ये पराभूत करून सामना जिंकला. यानंतर २००७ मध्येच भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये आमनेसामने आले. या सामन्यात भारताने पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवत ट्रॉफी उंचावली.

वकार युनिसला वाटते, की जर पाकिस्तानने त्यांच्या क्षमतेनुसार खेळ केला तर ते नक्कीच भारताला मागे टाकू शकतात. वकार क्रिकविकशी संभाषणात म्हणाला, “माझा मनापासून विश्वास आहे, की जर पाकिस्तानने आपल्या क्षमतेनुसार खेळ केला, तर ते भारताला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभूत करू शकतात. हे सोपे असणार नाही, परंतु आमच्याकडे निश्चितपणे असे खेळाडू आहेत, जे चांगले काम करू शकतात.”

हेही वाचा – RCB vs PBKS : केएल राहुलनं पंचांशी घातला वाद; ‘ती’ घटना पाहून नेटकरी म्हणाले, ‘‘पंचसुद्धा आर्यन खानबरोबर…”

“गोलंदाजी नेहमीच आमची मजबूत बाजू राहिली आहे आणि आम्ही भूतकाळात पाहिले आहे, की आमच्याकडे धावांचे रक्षण करण्याची क्षमता आहे. आम्ही हे चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये केले आहे. आम्ही ते आधीही केले आहे, त्यामुळे ही टीम त्या कामगिरीची पुनरावृत्ती का करू शकत नाही याचे मला कोणतेही कारण दिसत नाही. मला वाटते की हसन अली गोलंदाजीच्या बाबतीत आमचा प्रमुख खेळाडू असेल. मोठ्या स्टेजवर मोठी कामे करण्याचे कौशल्य त्याच्याकडे नक्कीच आहे”, असेही वकारने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer waqar younis believe pakistan can beat india in t20 world cup adn
First published on: 03-10-2021 at 18:58 IST