सून (स्वीडन) : इंग्लंड फुटबॉल संघाचे पहिले परदेशी प्रशिक्षक, तसेच इटली, पोर्तुगाल आणि स्वीडनमध्ये क्लब संघांना मार्गदर्शन करताना यशस्वी कामगिरी करणारे स्वेन-गोरान एरिक्सन यांचे सोमवारी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.

एरिक्सन यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्याला स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे सांगितले होते. तसेच आपण वर्षभराहून अधिक काळ जगू शकणार नसल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्या सर्वांत आवडत्या लिव्हरपूल क्लबने त्यांना एका विशेष सामन्यात प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी दिली होती.

Dipa Karmakar
‘तू कधीच जिमनॅस्ट होऊ शकत नाहीस’ ते ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट; जाणून घ्या दीपा कर्माकरबद्दल
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Texts owner Kishan Bagaria success story of building 400 crore from learning coding
ना कॉलेज, ना कोणती पदवी; वयाच्या १२व्या वर्षी कोडिंग शिकून बनला कोटींचा मालक, वाचा किशन बागरियाचा प्रेरणादायी प्रवास
chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview
आता तुल्यबळ खेळाडूंची फळी निर्माण करण्यावर भर – कुंटे
MS Dhoni enjoying riding a bike in Ranchi after his holiday in America video gone viral
MS Dhoni : अमेरिकेतून परतल्यानंतर धोनीने बाईकवरुन फार्महाऊसमध्ये मारला फेरफटका, VIDEO व्हायरल
43 students mexico protest
‘त्या’ ४३ विद्यार्थ्यांसाठी मेक्सिको का पेटलंय? २०१४ मध्ये बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर नक्की काय घडलं?
First photo of British Prime Minister Keir Starmer's new cat
इंग्लडच्या पंतप्रधानांच्या मांजरीचंही कौतुक; एक्सवर व्हायरल होतोय फोटो
juice vendors son clears neet in third attempt
Success Story: शाब्बास पठ्ठ्या..! ज्यूस विक्रेत्याच्या मुलाने तिसऱ्या प्रयत्नात NEET ची परिक्षा केली उत्तीर्ण

मायदेशात (स्वीडन) ‘स्वेनीस’ या नावाने प्रचलित असलेल्या एरिक्सन यांना वयाच्या २७व्या वर्षीच फुटबॉल खेळण्यातून निवृत्ती घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली. २००१ मध्ये त्यांची इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना इंग्लंडची ‘सुवर्ण पिढी’ मानल्या जाणाऱ्या डेव्हिड बेकहॅम, वेन रूनी, फ्रँक लॅम्पार्ड, स्टीव्हन जेरार्ड यांसारख्या नामांकित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची संधी लाभली.

हेही वाचा >>> विनेशने कुस्तीत राजकारण करू नये!‘डब्ल्यूएफआय’चे अध्यक्ष संजय सिंह यांची टिप्पणी

एरिक्सन यांच्या मार्गदर्शनाखालील इंग्लंडला २००२ आणि २००६ च्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले होते. मात्र, त्यांना अनुक्रमे ब्राझील आणि पोर्तुगालकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच २००६ च्या युरो अजिंक्यपद स्पर्धेतही इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, पण इथेही पोर्तुगालचे आव्हान त्यांना परतवता आले नाही.

फुटबॉलच्या मैदानाइतकेच मैदानाबाहेरही एरिक्सन चर्चेत राहिले. त्यांचे स्वीडनमधील अभिनेत्री आणि मॉडेल उलरिका जॉन्सन, तसेच फुटबॉल संघटनेच्या माजी सचिव फारिया आलम यांच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे इंग्लंडमधील वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याविषयी चर्चा असायची. ‘‘माझे वैयक्तिक आयुष्य फारसे वैयक्तिक राहिलेले नाही,’’ असे एरिक्सन २०१८ मध्ये म्हणाले होते. इंग्लंडनंतर एरिक्सन यांनी मेक्सिको, आयव्हरी कोस्ट आणि फिलिपिन्स या देशांच्या राष्ट्रीय संघांनाही मार्गदर्शन केले.

क्लब स्तरावर यश…

आंतरराष्ट्रीय स्तरावर एरिक्सन यांना कोणतीही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. मात्र, क्लब फुटबॉलमध्ये त्यांना यश मिळाले. एरिक्सन यांच्या मार्गदर्शनाखाली आयएफके गॉथनबर्ग क्लबने १९८२ मध्ये स्वीडनमधील लीग आणि युएफा चषकाचे जेतेपद पटकावले होते. बेन्फिका क्लबचे प्रशिक्षकपद भूषवताना त्यांनी तीन वेळा पोर्तुगालमधील लीग जिंकली. त्यांनी इटलीतील रोमा आणि सॅम्पदोरिया संघांना एकेकदा कोपा इटालियाचे जेतेपद मिळवून दिले. तसेच लॅझिओने ‘सेरी ए’, कोपा इटालिया (दोन वेळा), सुपरकोपा इटालियाना (दोन वेळा), युएफा सुपर चषक अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकल्या.