भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे आगामी हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या प्रशिक्षकपदी दिसण्याची शक्यता आहे. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार अनिल कुंबळे आणि पंजाबचं संघ व्यवस्थापन यांच्यात चर्चा सुरु असून, येत्या काही दिवसांमध्येच याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

अनिल कुंबळेने याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहिलं आहे. २०१६ साली अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. याव्यतिरीक्त पंजाबचं संघ व्यवस्थापन माईक हसी, जॉर्ज बेली आणि इतर खेळाडूंशी चर्चा करत आहे. त्यामुळे अखेरीस मुख्य प्रशिक्षकपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल वाजलं, ‘या’ दिवशी होणार खेळाडूंचा लिलाव