scorecardresearch

Premium

Shubman Gill: “जर तुम्हाला संघात टिकून राहायचे असेल तर…” माजी भारतीय क्रिकेटपटूचे शुबमन, रहाणेबाबत सूचक विधान  

Team India, IND vs WI: दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात गिलला चांगली संधी होती, विकेट चांगली होती, संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्याने खराब शॉट्स खेळले. यावर भारताचा माजी क्रिकेटपटूने शुबमन आणि रहाणेला सल्ला दिला आहे.

Runs are essential if you want to survive in the team Former Indian cricketer Wasim Jaffer's suggestive statement on Shubman Rahane
अजिंक्य रहाणे आणि शुबमन गिलला माजी कसोटीपटू वसीम जाफरने सल्ला दिला आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Team India, IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच प्रशिक्षक द्रविडने गिलला विचारले की त्याला कोणत्या क्रमांकावर खेळायचे आहे आणि गिलने सांगितले की, “त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते.” यानंतर गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जात आहे, मात्र आजपर्यंत तो काही विशेष करू शकलेला नाही. तसेच, अजिंक्य रहाणेही फारशी काही चांगली खेळी करू शकलेला नाही. यावर भारताचा माजी दिग्गज वसीम जाफरने या दोघांना मोलाचा सल्ला दिला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात अजिंक्य रहाणेला आतापर्यंत विशेष काही करता आलेले नाही. तो दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही स्वतःला सिद्ध करण्यात अपयशी ठरला. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला कसोटी संघात टिकून राहण्यासाठी धावा कराव्या लागतील, असे मत भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने व्यक्त केले. रहाणेला आपल्या खेळात सातत्य आणण्याची गरज आहे. ३५ वर्षीय रहाणेने आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अप्रतिम कामगिरी दाखवल्यानंतर पुन्हा फॉर्म खराब होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या सातत्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

India captain Rohit Sharma gives clear message ahead of World Cup Said The team's goal is important
IND vs AUS, World Cup: विश्वचषकापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिला स्पष्ट संदेश; म्हणाला, “संघाचे ध्येय…”
Rohit Sharma's press conference in World Cup 2023
IND vs AUS: रोहित शर्माने संघाची तयारी आणि शुबमन गिलच्या फिटनेसबद्दल दिली मोठी अपडेट; म्हणाला, ‘आमचे खेळाडू…’
india vs australia 1st odi at mohali match prediction z
India Vs Australia 1st ODI: अश्विन, सुंदरच्या कामगिरीकडे लक्ष! भारत-ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना आज मोहालीत
Kuldeep creates history in Sri Lanka match fourth bowler to take 150 wickets
Kuldeep Yadav: श्रीलंका-पाकिस्तान सामन्यात कुलदीपने रचला इतिहास, १५० विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज; म्हणाला, “निवृत्तीनंतर मी…”

वसीम जाफरने शुक्रवारी जिओ सिनेमावर बोलताना सांगितले की, “राहाणेला त्याच्या खेळात सातत्य आणावे लागेल, जी त्याची भूतकाळातील समस्या होती. जरी त्याने ८०-९० कसोटी खेळल्या असतील. पण सातत्य त्याच्यासाठी एक समस्या आहे. त्यावर त्याला मात करावी आहे. कारण रोहित शर्माच्या बाहेर पडल्यानंतर अजिंक्य रहाणेकडे भारतासाठी कर्णधारपदाचा चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला संघात टिकून राहायचे असेल तर सातत्याने धावा करणे आवश्यक आहे.”

हेही वाचा: Ayesha Naseem: पाकिस्तानी संघाची खेळाडू आयशाने वयाच्या १८व्या वर्षी सोडले क्रिकेट; म्हणाली, “मला माझे जीवन इस्लामनुसार…”

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता. यामुळे गिलला फक्त एकदाच फलंदाजीची संधी मिळाली आणि तो सहा धावा करून बाद झाला. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातही गिल केवळ १० धावाच करू शकला. जरी गिलकडे तिसऱ्या क्रमांकावर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी बराच वेळ असला तरी, त्याला लवकरात लवकर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची सवय करून घ्यावी लागेल, असे मत माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने व्यक्त केले. विशेषतः स्लो आणि कमी उसळी असलेल्या खेळपट्ट्यांवर अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

माजी कसोटीपटू जाफर म्हणाला, “मोठ्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, हे चांगले आहे की त्याला तिसर्‍या क्रमांकावर दीर्घकाळ फलंदाजी करायची आहे, पण सुरुवात त्याला हवी तशी झाली नाही. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याला चांगली संधी मिळाली, विकेट चांगली होती, संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. मला वाटले की त्याने बरेच लूज शॉट्स खेळले आहेत, त्यामुळे त्याला त्यात सुधार करण्याची गरज आहे.

हेही वाचा: BAN-W vs IND-W: आउट देताच कर्णधार हरमनप्रीत कौर भडकली, त्यानंतर असे काही केले की…; पाहा Video

पुढे जाफर म्हणाला की, “शुबमन मर्यादित क्रिकेटचे सामने खूप खेळतो त्यामुळे उसळी घेणारे चेंडू त्याला मारायला खूप आवडतात. गिलला पांढऱ्या चेंडूच्या वेगाची सवय आहे, पण कसोटी क्रिकेटमधील अशा कमी बाऊन्स असणाऱ्या खेळपट्ट्यांवर अधिक सावधपणे फलंदाजी करणे आवश्यक आहे. तसेच, जेव्हा तो भारतात खेळतो तेव्हा त्याला बाऊन्ससह चेंडू मारणे अवघड जाते. गिलला त्या परिस्थितीशी जुळवून घेणे गरजेचे आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former indian cricketer wasim jaffer had shubman gill and ajinkya rahane has been advised to stay in the team avw

First published on: 22-07-2023 at 19:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×