scorecardresearch

Premium

IND vs PAK: “तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ IPL खेळत असलात तरी…” पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने टीम इंडियावर साधला निशाणा

IND vs PAK, Asia Cup 2023: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने आशिया चषकात होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याआधी टीम इंडियाच्या फलंदाजीवर टीका केली आहे.

Whether playing IPL in the morning afternoon evening Pakistan Team will win Asia Cup Salman Butt targets India's batting
सलमान बटने आशिया कप २०२३आधी भारताच्या फलंदाजीवर निशाणा साधला आहे. सौजन्य- (ट्वीटर)

IND vs PAK, Asia Cup 2023: पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने आशिया कप २०२३आधी भारताच्या फलंदाजीवर निशाणा साधला आहे. वास्तविक, भारताला आशिया चषकातील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेतील कँडीत खेळायचा आहे. श्रेयस अय्यर, के.एल. राहुल आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियात परतले आहेत. मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये राहुल उपलब्ध होणार नाही. आशिया चषक आजपासून म्हणजेच ३० ऑगस्टपासून सुरु झाला असून पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना सुरु आहे.

टीम इंडियावर दबाव असेल- सलमान बट्ट

पाकिस्तानचा माजी सलामीवीर फलंदाज सलमान बट्ट त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, “भारताकडून खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे दबावही त्यांच्यावर जास्त आहे. कारण, मागील काळात दोन्ही देशांचे संबंध पाहता काही कारणास्तव भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंनी जरी कितीही आयपीएल खेळले असले तरी त्यांना अशा हायव्होल्टेज मुकाबल्यामध्ये खेळण्याचा अनुभव नाही. तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ जरी आयपीएल खेळत असलात तरी इथे खेळणे ही वेगळी बाब आहे. जरी तुम्ही आयपीएलमध्ये कितीही खेळलात तरी, भारत-पाकिस्तान सामन्यात जेवढे दडपण येते तेवढे आयपीएलमध्ये नसते.”

Asian Games 2023: After squash India defeated Pakistan in hockey also defeated Pakistan 10-2 in a one-sided match
Asian Games, IND vs PAK Hockey: लहरा दो…! टीम इंडियापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे, एकतर्फी सामन्यात १०-२ने भारताचा ऐतिहासिक विजय
World Cup 2023 Updates
VIDEO: ‘भारतातील ‘या’ दोन शहरात पाकिस्तान संघाला मिळणार जास्त पाठिंबा’; माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदचं मोठं वक्तव्य
Kuldeep creates history in Sri Lanka match fourth bowler to take 150 wickets
Kuldeep Yadav: श्रीलंका-पाकिस्तान सामन्यात कुलदीपने रचला इतिहास, १५० विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज; म्हणाला, “निवृत्तीनंतर मी…”
Kuldeep takes five wickets against Pakistan
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर कुलदीप यादवचा वाढला आत्मविश्वास; म्हणाला, ‘मी निवृत्तीनंतरही…’

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्ट त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारताच्या गोलंदाजांबद्दल म्हणाला की, “जर आपण भारताची वेगवान गोलंदाजी पाहिली तर फिटनेस ही चिंतेची बाब आहे. खेळाडू बर्‍याच काळापासून अनफिट आहेत. ते सध्या नाजूक स्थितीत आहेत की नाही हे आम्हाला माहित नाही, ते पूर्ण ताकदीने खेळतील का? अशा प्रश्न सर्व क्रिकेट वर्तुळात विचारला जात आहे.”

हेही वाचा: PAK vs NEP: नंबर १ पाकिस्तानला एक रन घेणं पडलं महाग, रोहितचा रॉकेट थ्रो अन् इमाम उल हक थेट तंबूत; पाहा Video

माजी डावखुरा सलामीवीर पुढे म्हणाला, “विराट कोहली आणि रोहित शर्मा व्यतिरिक्त त्यांच्याकडे तरुण खेळाडू आहेत ज्यांनी भरपूर क्रिकेट खेळले आहे पण त्यांना तेवढा अनुभव नाही. जेव्हा रोहित शर्मा चांगला खेळला असेल किंवा विराट कोहलीने काही नेत्रदीपक कामगिरी केली असेल तेव्हाच भारताने सामने जिंकले आहेत. जेव्हा जबाबदारी इतरांवर असते तेव्हा ते सर्वात जास्त संघर्ष करतात.”

तो पुढे म्हणाला की, “पाकिस्तानमध्ये बाबर, रिझवान, फखर, शादाब, शाहीन, हारिस रौफ आहेत. माझ्या मते पाकिस्तानमध्ये खूप मोठा कोअर ग्रुप आहे. भारताकडे जडेजा, शमी, बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे मॅचविनिंग खेळाडूही आहेत. पण त्यांची फलंदाजी कमकुवत आहे, जर पाकिस्तानने दोन मोठ्या विकेट्स लवकर घेतल्या तर इतरांना बरेच काही सिद्ध करायचे आहे. त्यामुळे ते टीम इंडियाला अडचणीत आणू शकतात. भारताविरुद्ध पाकिस्तानला आशिया चषक किंवा मायदेशातील विश्वचषकात सामने जिंकण्यास मदत होईल.”

हेही वाचा: IND vs PAK: “भारत-पाकिस्तान सामना अ‍ॅशेसपेक्षा मोठा”, ऑस्ट्रेलियन दिग्गज टॉम मूडी असे का म्हणाले? जाणून घ्या

पाकिस्तानला खूप फायदा होईल

पाकिस्तान संघाबाबत सलमान म्हणाला, “पाकिस्तानकडे आशिया चषक जिंकण्याचं अतिरिक्त फायदा आहे. आमच्याकडे असे गोलंदाज आहेत जे ९०प्रति/किमी वेगाने गोलंदाजी करू शकतात. त्याच्याकडे फक्त एक किंवा दोन गोलंदाज ९०प्रति/किमीच्या वेगाला स्पर्श करू शकतात, इतरांना तेवढा वेग नाही. हा एक अतिरिक्त फायदा पाककडे आहे. आमच्याकडे दोन्ही प्रकारचे फिरकीपटू आहेत, वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू आहेत आणि ते ताशी १४० किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करू करतात. त्यामुळे विजयाची संधी पाकिस्तानला अधिक आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former pakistan cricketer salman butt has criticized team indias batting ahead of the india pakistan match in the asia cup avw

First published on: 30-08-2023 at 17:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×