Kamran Akmal Bakrid Goat : येत्या रविवारी (१० जुलै) मुस्लिम बांधव बकरी ईदचा सण साजरा करणार आहे. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारीदेखील केली आहे. या दिवशी बोकडाची ‘कुर्बानी’ देणे महत्त्वाचे मानले जाते. म्हणून बहुतेक मुस्लिम बांधव निदान एका तरी बोकडाची कुर्बानी देतात. पाकिस्तानचा क्रिकेटपटू कामरान अकमलने तर बकरी ईदसाठी सहा बोकडांची खरेदी केल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यांचा बळी देण्यापूर्वीच अकमलला एक मोठा झटका बसला आहे. खरेदी केलेल्या बोकडांपैकी एक बोकड चोरीला गेला आहे.

पाकिस्तानी वेबसाइट द नेशनने दिलेल्या वृत्तानुसार, ७ जुलैच्या रात्री कामरान अकमलच्या बोकडाची चोरी झाली. लाहोरमधील एका खासगी हाउसिंग सोसायटीमध्ये असलेल्या कामरान अकमलच्या घरात ही घटना घडली. अकमलच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ईद उल-अजहानिमित्त (बकरीईद) कुर्बानी देण्यासाठी सहा बोकड खरेदी केले होते. हे सर्व बोकड लाहोरमधील घराबाहेर बांधले होते. त्यातीलच एक बोकड चोरी गेला.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Encroachment by Navi Mumbai mnc
पालिकेकडूनच अतिक्रमण, वाशी सेक्टर १४ मध्ये पदपथावर कंटेनर हजेरी कार्यालय
vasai liquor party on boat marathi news, roro boat liquor party marathi news
वसई-भाईंदर रोरो सेवेच्या बोटीत मद्य पार्टी, समाजमाध्यमांवर चित्रफित प्रसारित

हेही वाचा – Video : लंडनच्या रस्त्यावर मनसोक्त नाचला ‘दादा’; मुलगी झाली डीजे

घटनेची माहिती देताना अकमलचे वडील म्हणाले, “ही चोरी पहाटे तीन वाजन्याच्या सुमारास घडली असावी. मी माझ्या नोकरावर बकऱ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवली होती. पण, तो पहाटे झोपी गेला. चोरीला गेलेला बोकड ९० हजार रुपयांना विकत घेण्यात आला होता. हाऊसिंग सोसायटीच्या सुरक्षा एजन्सीने चोरीला गेलेला बोकड परत मिळवून दोषींना पकडण्याचे आश्वासन दिले आहे.”