वेटेलला पोल पोझिशन इटालियन

फॉम्र्युला वन शर्यतीच्या जेतेपदाच्या पायाभरणी समजल्या जाणाऱ्या पात्रता शर्यतीत पोल पोझिशनमधली लुईस हॅमिल्टनची

फॉम्र्युला वन शर्यतीच्या जेतेपदाच्या पायाभरणी समजल्या जाणाऱ्या पात्रता शर्यतीत पोल पोझिशनमधली लुईस हॅमिल्टनची मक्तेदारी सिबॅस्टिन वेटेलने मोडून काढली. इटालियन ग्रां.प्रि.साठी शनिवारी वेटेलने पोल पोझिशन पटकावली. पात्रता शर्यतीत वेटेलच्या रेड बुल संघाने वर्चस्व राखले. वेटेलचा संघ सहकारी मार्क वेबरने दुसरे स्थान पटकावले. सोबर संघाच्या निको हल्केनबर्गने तिसरे स्थान पटकावले. तीन वेळा जागतिक विश्वविजेतेपदाचा मानकरी ठरलेल्या वेटेलने एक मिनिट आणि २३.७५५ सेकंदांत सर्वात जलद लॅप करण्याची कामगिरी
केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Formula one red bulls set practice pace at monza