मुंबईच्या चार क्रिकेटपटूंना करोनाची लागण

मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) त्यांच्या जागी निवड केलेल्या चार खेळाडूंची नावे लवकरच जाहीर करणार आहे

मुश्ताक अली ट्वेन्टी-२० करंडक क्रिकेट स्पर्धेआधी धक्का

मुंबई : सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुंबईच्या चार क्रिकेटपटूंना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्पर्धेआधीच मुंबईला धक्का बसला आहे. त्यांच्या जागी चार बदली खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

‘‘मुंबईच्या संघामधील खेळाडूंच्या करण्यात आलेल्या करोना चाचणीत शाम्स मुलानी, साईराज पाटील, प्रशांत सोळंकी आणि सर्फराझ खान या चार क्रिकेटपटूंना बाधा झाल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे.  मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) त्यांच्या जागी निवड केलेल्या चार खेळाडूंची नावे लवकरच जाहीर करणार आहे. या बदली खेळाडूंचीही करोना चाचण करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती ‘एमसीए’च्या सूत्रांनी दिली. गुवाहाटीमध्ये ४ नोव्हेंबरपासून साखळी सामन्यांना प्रारंभ होणार असून, मुंबईचा समावेश एलिट ब-गटात करण्यात आला आहे. मुंबईची सलामी कर्नाटकशी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Four mumbai cricketers infected with corona zws

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या