scorecardresearch

Premium

French Open Tennis Tournament फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: जोकोव्हिच, अल्कराझची विजयी घोडदौड

अग्रमानांकित स्पेनचा कार्लोस अल्कराझ व तिसरा मानांकित सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांनी फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली.

Djokovic
नोव्हाक जोकोव्हिच

रूड, नॉरी, रुबलेव्हची आगेकूच; महिलांत सबालेन्का, रायबाकिनाचे विजय

पॅरिस : अग्रमानांकित स्पेनचा कार्लोस अल्कराझ व तिसरा मानांकित सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांनी फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. ब्रिटनचा कॅमेरुन नॉरी, आंद्रे रुब्लेव्ह व नॉर्वेचा कॅस्पर रूड यांनीही आगेकूच केली. महिला गटात अरिना सबालेन्का, दारिया कसात्किना व कझाकस्तानच्या एलिना रायबाकिना यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला.

जोकोव्हिचने दुसऱ्या फेरीतील सामन्यात हंगेरीच्या माटरेन फुक्सोव्हिक्सला ७-६ (७-२), ६-०, ६-३ असे नमवत तिसरी फेरी गाठली. पुढच्या फेरीत त्याच्यासमोर अलेहांद्रो डेव्हिडोव्हिच फोकिनाचे आव्हान असेल.अल्कराझने जपानच्या टारो डॅनिएलवर ६-१, ३-६, ६-१, ६-२ असा विजय साकारला. पुढच्या फेरीत अल्कराझसमोर कॅनडाच्या डेनिस शापाव्हालोव्हचे आव्हान असेल.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यात रूडने इटलीच्या गुइलिओ झेप्पिइरीला ६-३, ६-२, ४-६, ७-५ असे पराभूत केले. रुब्लेव्ह फ्रान्सच्या कॉरेन्टिन मॉटेटला ६-४, ६-२, ३-६, ६-३ असे नमवले. त्तर, नॉरीने फ्रान्सच्या लुकास पॉइलेवर ६-१, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला.महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित सबालेन्काने इरिना श्यमानोव्हिचला ७-५, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. तर, कसात्किनाने चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोड्रोसोव्हाला ६-३, ६-४ असे नमवले. रायबाकिनाने चेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोव्हावर ६-३, ६-३ असा विजय साकारला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: French open tennis tournament novak djokovic and carlos alcaraz advance to the third round amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×