French Open Tennis Tournament: पॅरिस : ग्रीसचा तारांकित खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपासने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. तर, अमेरिकेच्या टेलर फ्रिट्ज व डेन्मार्कच्या होल्गर रुननेही विजय नोंदवले. महिला गटात अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑनटेक, कझाकस्तानच्या एलिना रायबाकिना व तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने विजय नोंदवत पुढची फेरी गाठली.

त्सित्सिपासने स्पेनच्या रोबेटरे कार्बालेस बाएनाला ६-३, ७-६ (७-४), ६-२ असे पराभूत केले. अन्य सामन्यात, रुनने अमेरिकेच्या ख्रिस्तोफर युबँक्सला ६-४, ३-६, ७-६ (७-२), ६-२ असे नमवले. फ्रिट्जने आपल्याच देशाच्या मायकल मोहला ६-२, ६-१, ६-१ असे सहज पराभूत केले. महिला गटात श्वीऑनटेकने स्पेनच्या क्रिस्टिना बुक्सावर ६-४, ६-० असे सरळ सेटमध्ये विजय मिळवला.तर, रायबाकिनाने चेक प्रजासत्ताकच्या ब्रेंडा फ्रुहविर्तोव्हाला ६-४, ६-२ अशा फरकाने नमवले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

साकेत-युकी जोडीचा विजय

भारताच्या साकेत मायनेनी व युकी भांबरी या पुरुष दुहेरीच्या जोडीने फ्रान्सच्या आर्थर रिंडरक्नेच व एन्झो कॉकॉड जोडीचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. अन्य, दुहेरी सामन्यात भारताच्या जीवन नेदूंचेझियान व एन. श्रीराम बालाजी जोडीने ऑस्ट्रेलियाच्या इल्या इवाश्का व ॲलेक्झेइ पॉपरिन जोडीकडून ३-६, ४-६ अशी हार पत्करली.

Story img Loader