Premium

French Open Tennis Tournament फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: त्सित्सिपास तिसऱ्या फेरीत

ग्रीसचा तारांकित खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपासने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. तर, अमेरिकेच्या टेलर फ्रिट्ज व डेन्मार्कच्या होल्गर रुननेही विजय नोंदवले.

Stefanos Tsitsipas tennies
स्टेफानोस त्सित्सिपास

French Open Tennis Tournament: पॅरिस : ग्रीसचा तारांकित खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपासने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. तर, अमेरिकेच्या टेलर फ्रिट्ज व डेन्मार्कच्या होल्गर रुननेही विजय नोंदवले. महिला गटात अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑनटेक, कझाकस्तानच्या एलिना रायबाकिना व तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने विजय नोंदवत पुढची फेरी गाठली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्सित्सिपासने स्पेनच्या रोबेटरे कार्बालेस बाएनाला ६-३, ७-६ (७-४), ६-२ असे पराभूत केले. अन्य सामन्यात, रुनने अमेरिकेच्या ख्रिस्तोफर युबँक्सला ६-४, ३-६, ७-६ (७-२), ६-२ असे नमवले. फ्रिट्जने आपल्याच देशाच्या मायकल मोहला ६-२, ६-१, ६-१ असे सहज पराभूत केले. महिला गटात श्वीऑनटेकने स्पेनच्या क्रिस्टिना बुक्सावर ६-४, ६-० असे सरळ सेटमध्ये विजय मिळवला.तर, रायबाकिनाने चेक प्रजासत्ताकच्या ब्रेंडा फ्रुहविर्तोव्हाला ६-४, ६-२ अशा फरकाने नमवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 00:50 IST
Next Story
खेळाडूंनी चौकशी पूर्ण होईपर्यंत संयम बाळगावा! -अनुराग ठाकूर