Asia Cup 2022 : आशिया चषकात बुधवारी भारत विरुद्ध हाँगकाँग सामना पार पडला. या सामन्यात भारताने हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात कर्णधार रोहीत शर्माने भारतीय संघात एक बदल करत, फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतला खेळवल्याने गौतम गंभीर रोहीत शर्मावर चांगलाच भडकला.

हेही वाचा – “म्हणजे केएल राहुलने खेळू नये असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”; सूर्यकुमार यादवचे पत्रकारांना मजेशीर उत्तर

हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतला समावेश केल्याने गंभीरे रोहित शर्माला चांगलेच सुनावले. तो म्हणाला, ”मी हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतला कधीच घेतले नसते. आपल्याकडे दीपक हुड्डासारखा खेळाडू असताना त्याची निवड केली असती, वेळप्रसंगी तो षटकेही टाकू शकला असता, दिनेश कार्तिकच्या पंतला घ्यायचे होते आणि हार्दिकच्या जागी हुड्डाचा समावेश करायचा होता”

हेही वाचा – Asia Cup 2022: मॅच हरल्यावर हॉंगकॉंग क्रिकेट संघाने केलेली ‘ही’ कृती पाहून कोहली झाला खुश, म्हणाला “तुम्ही..

दरम्यान, ऋषभ पंतला पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्या जागी दिनेश कार्तिकला यष्टिरक्षक म्हणून संघात ठेवण्यात आले होते. मात्र, हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला स्थान देण्यात आले.