भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर करोनाच्या विळख्यात सापडला आहे. गंभीरने सोशल मीडियावर ही माहिती दिली. करोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर गंभीरची चाचणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे गंभीरने म्हटले आहे. आहेत. गौतम गंभीरने गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना करोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे.

“मी सौम्य लक्षणांनंतर करोना पॉझिटिव्ह आढळले आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांची चाचणी करून घ्या आणि सुरक्षित रहा,” असे गौतम गंभीरने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

२०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपाच्या तिकीटावर लढून गंभीरने जिंकली. ते पूर्व दिल्लीचे खासदार आहेत. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधारही राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआर २०१२ आणि २०१४ मध्ये चॅम्पियन बनले.

“बॅट कायम तलवारीसारखी चालवली की जीव जातो,” पंतच्या फलंदाजीवर गंभीरचं स्पष्ट मत; म्हणाला, “तो विराट नाही…”

पूर्व दिल्लीचे लोकसभेचे खासदार गंभीर हे लखनऊ सुपर जायंट्स या नवीन आयपीएल संघाचे मार्गदर्शक देखील आहेत. २०१८ मध्ये गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. २००७ आणि २०११ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता. केएल राहुल व्यतिरिक्त, लखनऊच्या नवीन आयपीएल संघाने मार्कस स्टॉइनिस आणि लेगस्पिनर रवी बिश्नोईचा ड्राफ्टमध्ये समावेश केला आहे. त्याचबरोबर अँडी फ्लॉवर या संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील.

IND vs SA : हे वागणं बरं नव्हं..! विराटचं कृत्य पाहून गौतम गंभीर भडकला; म्हणाला, “असा कॅप्टन…”

दरम्यान, देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५५ हजार ८७४ नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या २२ लाखांच्या वर गेली असली तरी त्याच वेळी, गेल्या २४ तासात ६१४ लोकांचा मृत्यू झाला आहे.