India Head Coach Interview Today: भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. पण या प्रशिक्षकपदासाठी केवळ एकाच उमेदवाराने अर्ज केला आहे. भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर हा भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेला एकमेव उमेदवार आहे. आज म्हणजेच मंगळवारी झूम कॉलवर क्रिकेट सल्लागार समितीसमोर गंभीर मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहे. या समितीमध्ये अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे.

भारताच्या प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीर एकमेव अर्जदार

भारताचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मेच्या मध्यात या पदासाठी अर्ज मागवले होते आणि आयपीएल फायनलच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७मे ही अंतिम मुदत होती. गौतम गंभीर हा सध्याच्या आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर आहे.

Who is Sairaj Bahutule India Interim Bowling Coach
IND vs SL: भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले आहेत तरी कोण? देशांतर्गत क्रिकेटमधील आकडे वाचून व्हाल चकित
Rahul Dravid May Return as Rajasthan Royals Head Coach
Rahul Dravid: पुन्हा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार राहुल द्रविड? KKR नव्हे तर ‘या’ संघासह IPL मध्ये करणार पुनरागमन
Abhishek Nair Ten Doscate assistant coach for Sri Lanka tour sport news
श्रीलंका दौऱ्यासाठी अभिषेक नायर, टेन डोस्काटे साहाय्यक प्रशिक्षक?
JCAC Member atin Paranjape on Gautam Gambhir
गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड होताच, पहिला वाद समोर; सीएसी सदस्य जतिन परांजपे उद्विग्न होत म्हणाले…
BCCI Denies Gautam Gambhirt Coaching Staff Recommendations
BCCIचा गौतम गंभीरला धक्का, प्रशिक्षक म्हणून निवडलेल्या कोचिंग स्टाफला बोर्डाने दिला नकार
gautam gambhir jay shah bcci head coach
मोठी बातमी! गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड
Jay Shah said two names shortlisted for Team India coach
“दोन नावं शॉर्टलिस्ट…”, गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या चर्चांदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाहांचा मोठा खुलासा
Sevagram, doctor, India team,
विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या संघाला सेवाग्रामच्या डॉक्टरांचे योगदान, जाणून घ्या सविस्तर

हेही वाचा – Super 8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर

सलील अंकोला यांच्या जागी नवीन निवडकर्ताच्या पदासाठीही समितीकडून मुलाखती घेतल्या जातील. अंकोला आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हे दोघेही पश्चिम विभागातील आहेत, त्यामुळे रिक्त पदावरील नवीन निवडकर्ता हा उत्तर विभागातील, असण्याची शक्यता आहे. आगरकर यांची गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि स्टिंग ऑपरेशनमुळे पायउतार झालेल्या चेतन शर्मांची जागा त्यांनी घेतली. आगरकर यांनी पदभार स्वीकारला तेव्हा अंकोला आधीच निवडकर्ता होते.

“आम्ही मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्ता पदासाठी उमेदवारांसाठी मुलाखत सत्र आयोजित करत आहोत. क्रिकेट सल्लागार समिती आपली शिफारस बीसीसीआयकडे सादर करेल आणि त्यानंतर बोर्ड अधिकृत घोषणा करेल,” असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

भारताच्या प्रशिक्षकपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून रिकी पॉन्टिंग आणि जस्टीन लँगर यांच्याशी बीसीसीआयने संपर्क केला नसल्याचे स्पष्ट झाले. नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा जुलै २०२४ मध्ये सुरू होईल आणि ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत असेल.

हेही वाचा – IND W vs SA W: स्मृती मानधना ठरली टीम इंडियासाठी तारणहार; शतकी खेळीसह ऐतिहासिक कामगिरी करणारी दुसरी भारतीय फलंदाज

बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकपदासाठी घातलेल्या कठोर अटी

किमान ३० कसोटी सामने किंवा ५० एकदिवसीय सामन्यांचा अनुभव.
किंवा किमान दोन वर्षे पूर्ण वेळ कसोटी खेळणाऱ्या देशाचा मुख्य प्रशिक्षक असणे आवश्यक आहे.
किंवा कोणत्याही असोसिएट सदस्य संघाचा/कोणत्याही आयपीएल संघाचा किंवा अशा कोणत्याही लीग किंवा प्रथम श्रेणी संघाचा किंवा कोणत्याही देशाच्या अ संघाचा तीन वर्षे प्रशिक्षक असण्याचा अनुभव.
किंवा बीसीसीआयचे लेव्हल-3 कोचिंग प्रमाणपत्र धारक असले पाहिजे.
आणि वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.