Gautam Gambhir Offered Blank Cheque By SRK: भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर सारख्या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांशी संपर्क साधल्याच्या चर्चा मागील काही दिवसात फारच रंगल्या होत्या. यानंतर बीसीसीआयकडून जय शाह यांनी स्पष्टीकरण देत असा कोणताही प्रस्ताव मांडला नसल्याचे सांगितले. शिवाय मुख्य प्रशिक्षक पदासाठी भारतीय खेळाडूंना प्राधान्य देण्याचा विचारही शाह यांनी मांडला. या घटनाक्रमामुळे सध्या भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत गौतम गंभीर हा सगळ्यात आघाडीवर असणाऱ्या खेळाडू दिसत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली व श्रेयस अय्यरच्या नेतृत्वामुळे केकेआरने तब्बल १० वर्षांनी आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले यामुळे निश्चितच गंभीरच्या प्रतिष्ठेत आणखी वाढ झाली आहे. क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी याच वर्षी गंभीरने आपल्या राजकीय कारकिर्दीला सुद्धा विराम देण्याचे ठरवले होते. यामुळे गंभीरची प्रशिक्षकपदी वर्णी लागण्याची शक्यता सर्वाधिक आहे. या शक्यतेमागील कारणांचा हा धावता आढावा पहा..

आज, २७ मे हा दिवस भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. राहुल द्रविड आपली मुदत संपल्यावर पुन्हा पद मिळवण्यासाठी अर्ज करणार नाही हे स्पष्ट आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
IPL 2024 Prize money updates in marathi
IPL 2024 Prize Money : जेतेपदानंतर कोलकाता टीम मालामाल, उपविजेत्या हैदराबादवरही पैशांचा पाऊस
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Ravichandran Ashwin Calls Sanju Samson Selfish After RR Captain Selected For T20 World Cup
“तो स्वार्थीपणे खेळतोय..”, अश्विनने संजु सॅमसनची विश्वचषकाच्या संघात निवड होताच केलं मोठं विधान; म्हणाला,”त्याची गरज..”

गंभीरच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात टीम मेंटॉर म्हणून एक उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. २०२२ मध्ये, त्याला लखनऊ सुपर जायंट्समध्ये भूमिका सोपवण्यात आली, तेव्हा संघाला त्याने प्लेऑफ पर्यंत नेले आणि लीग स्टेजमध्ये बॅक-टू-बॅक सीझनमध्ये तिसरे स्थान मिळवले.

२०२४ चा हंगाम सुरू होण्याआधी, कोलकाता नाईट रायडरने गंभीरला त्याच स्थानासाठी आपल्या संघात सामील करून घेतले. दोन वेळच्या चॅम्पियन्सने लीग टप्प्यात टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले होते आणि ते स्पर्धेतील अंतिम फेरी गाठणारे पहिले स्पर्धक ठरले होते.

दरम्यान दैनिक जागरणमध्ये शनिवारी प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याबाबत गंभीरने बीसीसीआयशी संपर्क साधला होता. तसेच कालच्या केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याच्या वेळी तो चेन्नईमध्ये काही BCCI प्रमुखांना भेटण्याची शक्यता होती. गंभीरने अद्याप भूमिकेसाठी आपला अर्ज सादर केल्याची कोणतीही ठोस माहिती नाही पण एकदा अर्ज केल्यानंतर, द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून त्याची अधिकृतपणे घोषणा होण्याची पूर्ण शक्यता आहे.

दुसरीकडे, समजा जर गंभीरची बीसीसीआयकडून प्रशिक्षकपदी नेमणूक झाली तर त्याला केकेआरचे मेन्टॉरपद सोडावे लागू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार शाहरुख खानने गंभीरला कोलकाताच्या संघात समाविष्ट करून घेण्यासाठी तसेच १० वर्षे संघाचे व्यवस्थापन पाहण्यासाठी चक्क कोरा चेक दिला होता. जर गंभीरला आता केकेआरची कास सोडायची असेल तर शाहरुखसह सुद्धा वेगळी चर्चा करावी लागू शकते.

या सगळ्या चर्चांवर आज २७ मे ला बीसीसीआयची अर्ज प्राप्त करण्याची मुदत संपल्यावर कदाचित ठोस उत्तर मिळू शकते. दरम्यान यावर गंभीर, केकेआर किंवा बीसीसीआयकडून कोणतेही स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही.