भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने काही वेळात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप फायनलबाबत मोठे भाकीत केले आहे. गंभीरने न्यूझीलंडला आपली पसंती दिली असून त्यांनी ही स्पर्धा का जिंकली पाहिजे, याचे कारणही दिले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील शत्रुत्वाचाही उल्लेखही त्याने केला. तो म्हणाला, ”भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश आहेत आणि दोघांमधील द्वंद्व खूप प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन शेजारी देश असून क्रिकेटच्या मैदानावर या दोघांमधील कडाक्याचे शत्रुत्व पाहायला मिळते.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी दुबईच्या मैदानावर टी-२० विश्वचषक २०२१चा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामनाही चुरशीचा असेल, कारण दोन शेजारी देश ट्रॉफीसाठी एकमेकांशी लढताना दिसणार आहेत. किवी आणि कांगारू संघ यांच्यातील लढत भारत आणि पाकिस्तान सारखीच आहे का? या जेतेपदाच्या लढतीत आणखी कोण जिंकू शकते, याविषयी गौतम गंभीरने वक्तव्य केले आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेसाठी लिहिलेल्या स्तंभात गंभीर म्हणाला, “ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील क्रिकेट वैर लक्षात घेणे कठीण आहे. भारत आणि पाकिस्तान प्रमाणेच ते देखील शेजारी आहेत. भारतीय आणि पाकिस्तानी लोकांप्रमाणेच, ऑस्ट्रेलियन आणि किवी एकमेकांशी विरोधक आहेत. विकिपीडियावर ‘भारत पाकिस्तान क्रिकेट स्पर्धा’ वर एक पृष्ठ आहे, तसेच ऑस्ट्रेलियन आणि किवींसाठी अधिक व्यापक आहे.”

हेही वाचा – T20 WC FINAL : “आता त्यांची वेळ आलीय..”, गांगुलीनं नवा विश्वविजेता म्हणून ‘या’ संघाला दिली पसंती!

गंभीर पुढे म्हणाला, “न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक २०२१ची फायनल जिंकावी, अशी माझी इच्छा आहे, कारण ते चांगले क्रिकेट खेळत आहेत. तसेच मी एक किवी जोक ऑनलाइन ऐकला आहे. तो असा आहे की, ‘एक किवी त्याच्या ऑस्ट्रेलियन मित्राला विचारतो की तुला ऑस्ट्रेलियाच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीबाबत एक विनोद ऐकायचा आहे. ऑस्ट्रेलियन मुलाने उत्तर दिले, ‘हो मित्रा’ आणि मग किवी उत्तरला, ‘किती वाईट आहे की तुम्ही अजूनही त्यावर काम करत आहात.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir prediction about winner of t20 world cup 2021 adn
First published on: 14-11-2021 at 16:04 IST