Abhishek Sharma Celebration Video: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने वादळी सुरूवात केली. दरम्यान षटकांराचा पाऊस पाडून अभिषेकने ३० चेंडूंमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अभिषेक शर्मा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पहिल्या सामन्यात त्याने ८२ धावांची वादळी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही तो अर्धशतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण अर्धशतक थोडक्यात हुकलं होतं. या सामन्यात पहिल्या षटकापासून त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला.

शतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माचं सेलिब्रेशन

अभिषेक शर्माने आतापर्यंत जितक्या वेळेस शतक झळकावलं आहे, त्यावेळी त्याने लव्ह सेलिब्रेशन केलं आहे. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात असं काही सेलिब्रेशन केलं, जे याआधी कुठल्याही फलंदाजाने केलं नसावं. त्याने बॅट आणि हेल्मेट बाजूला ठेवलं आणि मांडी घालून खाली बसला. त्यानंतर ‘ओम नम शिवाय..’, सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन पाहून नेहमी गंभीर असणाऱ्या गौतम गंभीरलाही हसू आलं. अभिषेकच्या सेलिब्रेशनचा आणि गौतम गंभीरच्या रिअॅक्शनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने उभारला धावांचा डोंगर

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर .. धावांचा डोंगर उभारला आहे. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करताना संजू सॅमसनने ५० धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने सर्वात वेगवान शतक झळकावून १०८ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने २९ धावांची खेळी केली.