scorecardresearch

Premium

Gautam Gambhir: ‘…म्हणून आजही २००७ च्या टी-२० विश्वचषकाबद्दल वाटते खंत’; गौतम गंभीरने केला खुलासा

Gautam Gambhir on T20 World Cup 2007: गौतम गंभीरने २००७ आणि २०११ च्या विश्वचषकाबद्दल्यचा आठवणी सांगितल्या. त्याचबरोबर त्याने २००७ च्या टी-२० विश्वचषकाबद्दल एक खंत व्यक्त केली.

Gautam Gambhir said that being left out of the 2007 World Cup squad was the toughest moment of his career
गौतम गंभीरने २००७ आणि २०११ च्या विश्वचषकाबद्दल्यचा आठवणी सांगितल्या. संग्रहित छायाचित्र (ट्वीटर)

Gautam Gambhir Expresses Regrets About T20 World Cup 2007: भारताचे माजी फलंदाज आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांनी २००७ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाकडून दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या माजी फलंदाजाने सांगितले की, पहिल्या टी-२० विश्वचषकासाठी त्याची निवड न केल्याने त्याच्यावर अन्याय झाला, जो तो अजूनही विसरलेला नाही.

गौतम गंभीर म्हणाला की, २००७ च्या विश्वचषक संघातून वगळणे हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण क्षण होता. गंभीर पुढे म्हणाला की, जेव्हा त्याची या स्पर्धेसाठी निवड झाली नाही, तेव्हा त्याला वाटले की त्याचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न संपले आहे. बरं, २०११ चा विश्वचषक जिंकण्याचा अनोखा गौरव गंभीरकडे आहे.

Pakistan vs Netherlands Cricket Cricket World Cup 2023
World Cup 2023, PAK vs NED: बाबर आझम वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये ठरला फ्लॉप, सोशल मीडियावर युजर्सनी उडवली खिल्ली
World Cup 2023 Updates
World Cup 2023: स्टुअर्ट ब्रॉडची विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारबद्दल मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘या’ संघाला विश्वचषकात रोखणे कठीण
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video
ICC World Cup 2023: World Cup ticket increased KL Rahul's worries know why he said I will not answer to anyone
World Cup 2023: विश्वचषकाच्या तिकिटांमुळे के.एल. राहुलची चिंता वाढली; म्हणाला, “मी कोणालाच उत्तर देणार नाही…”

हेही वाचा: AFG vs PAK: रहमानउल्ला गुरबाजने मोडला महेंद्रसिंग धोनीचा १८ वर्ष जुना विक्रम, पाकिस्तानविरुद्ध केला खास कारनामा

माझ्यावर अन्याय झाला – गौतम गंभीर

२००७ च्या टी-२० वर्ल्ड कपने क्रिकेटच्या नवीन फॉरमॅटला प्रोत्साहन दिले. त्यानंतर एक नवीन पर्व सुरू झाले. २००७ च्या टी-२० विश्वचषकात, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आणि चॅम्पियन बनले, परंतु या ऐतिहासिक विजयाचा भाग न होणे अजूनही गौतम गंभीरला टोचते.

हेही वाचा: Asia Cup 2023: “तुम्हाला सिराजलाच…”, शार्दुल ठाकुर आणि प्रसिद्ध कृष्णाबद्दल आकाश चोप्राचे मोठं वक्तव्य

गौतम गंभीरने रेव्हस्पोर्ट्झशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “२०११ चा विश्वचषक जिंकणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा विजय होता. मी २००७ टी-२० विश्वचषक खेळलो नाही आणि मला अजूनही वाटते की, मला वगळणे चूकीचे होते. चांगली कामगिरी करूनही माझी निवड का झाली नाही, हे मला अजूनही कळत नाही. २०११ चा विश्वचषक हा एकमेव ५० षटकांचा विश्वचषक होता, जो मी माझ्या कारकिर्दीत खेळला आणि जिंकला. म्हणूनच मला एकमेव एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा अनोखा गौरव प्राप्त झाला आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautam gambhir said that being left out of the 2007 world cup squad was the toughest moment of his career vbm

First published on: 25-08-2023 at 15:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×