scorecardresearch

VIDEO: फायनलमधील पराभवानंतर गौतम गंभीरने जिंकली भारतीयांची मनं; म्हणाला, “केवळ जिंकणारा संघच…”

Gautam Gambhir Viral Video: विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय खेळाडूंचे मन दुखावले आहे. अनेक खेळाडूंना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. भारतीय संघातील खेळाडूंच्या डोळ्यातील अश्रू पाहून अनुभवी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्यांचे सांत्वन केले.

Ind vs AUS Australia Won One Day World Cup 2023 in Marathi
गौतम गंभीरने आपल्या वक्तव्याने जिंकली भारतीयांची मनं फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Gautam Gambhir says As I have said we are a champion team irrespective So chin up boy: आयसीसी एकदिवसीय विश्वचक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून भारताचा पराभव केला. त्याचबरोबर सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. परंतु टीम इंडियाचे तिसऱ्यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू निराशा असल्याचे दिसून आले. ज्यावर आता माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१९ नोव्हेंबर रोजी भारताने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ गमावल्यानंतर, माजी क्रिकेटपटू सोशल मीडियावर विविध वक्तव्य करत आहेत. अनेक माजी खेळाडू भारतीय खेळाडूंना फटकारताना दिसले, तर काही दिग्गजांनी संघाचे समर्थन केले. दरम्यान, गौतम गंभीरही टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी पुढे आला आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली. गौतम गंभीरने ‘एक्सवर’ (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करताना लिहले, “मी म्हटल्याप्रमाणे, आम्ही एक चॅम्पियन संघ आहोत. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी मान उंच ठेवावी. ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन!”

Indian cricket team
विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला?
IND vs AUS 2nd ODI Match Updates
IND vs AUS 2nd ODI: दुखापतीनंतर श्रेयस अय्यरचे शानदार कमबॅक! टीका करणाऱ्यांना दिलं चोख प्रत्युत्तर, शुबमन गिलही शतकवीर
Strange incident happened in India-Sri Lanka match fans of both countries clashed during the live match Video viral
IND vs SL: भारत-श्रीलंका सामन्यात घडला विचित्र प्रकार, थेट सामन्यादरम्यान भिडले दोन्ही देशांचे फॅन्स; Video व्हायरल
Kuldeep Yadav Brutally Trolled For Going To Bageshwar Dham Dheerendra Shastri Netizens Slam Asia Cup 2023 IND vs PAK Star
“कुलदीप यादवचं नशीब चमकतंय कारण..”, धीरेंद्र शास्त्रींबरोबरचे फोटो व्हायरल; नेटकऱ्यांची सडकून टीका

केवळ जिंकणारा संघच चॅम्पियन पक्ष नसतो –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गौतम गंभीर म्हणाला की, “मला भारतीय संघ आणि देशवासीयांना सांगायचे आहे की, निकाल तुमच्या बाजूने लागला नसला तरीही तुम्ही चॅम्पियन संघ आहात. केवळ जिंकणारा संघच चॅम्पियन पक्ष नसतो. आम्ही १० सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली हा एक प्रवास आहे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. परिणाम काहीही असो, आपण या विजयांचा आनंद घेतला पाहिजे.”

सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ विकेट गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.

हेही वाचा – VIDEO: फायनलनंतर विराटने मॅक्सवेलला मिठी मारत जिंकली चाहत्यांची मनं, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला दिले खास गिफ्ट

तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautam gambhir says as i have said we are a champion team irrespective so chin up boy many many to australia vbm

First published on: 20-11-2023 at 14:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×