Gautam Gambhir while wishing Naveen Ul Haq on his birthday: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावले, परंतु सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा राहिला तो म्हणजे विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतरही अनेक दिवस क्रिकेटविश्वात या वादाची चर्चा सुरू होती. आता पुन्हा एकदा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. कारण गौतम गंभीरने नवीन उल हक वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एक खास सल्ला दिला आहे. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते भडकले आहेत.

वास्तविक, नवीन उल हक आज म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरसह अनेक क्रिकेटपटू त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. गंभीरने नवीनला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. गौतम गंभीरने नवीनसोबतचा त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, “हॅपी बर्थडे नवीन उल हक! तुझ्यासारखे फार थोडे आहेत. कधीही बदलू नको!”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

माजी क्रिकेटपटून गौतम गंभीरने ही पोस्ट शेअर करताच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्सचा महापूर आला. गंभीरच्या या पोस्टमुळे विराट कोहलीचे अनेक चाहते संतप्त झाले आहेत. त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये नवीन आणि गौतम यां दोघांवर टीका करायला सुरुवात केली आहे. या पोस्टद्वारे गंभीरने विराट कोहलीवर निशाणा साधला असावा, असे चाहत्यांना वाटते.

नवीन दोन वर्षांपासून वनडे संघाबाहेर –

उल्लेखनीय आहे की नवीन उल हक २०२३ च्या विश्वचषकासाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भाग नाही. अलीकडेच अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला, तेव्हा नवीनचे नाव त्या १७ खेळाडूंमध्ये नव्हते. २३ वर्षीय नवीन दोन वर्षांहून अधिक काळ अफगाणिस्तानच्या वनडे संघातून बाहेर आहे. त्याने जानेवारी २०२१ मध्ये आयर्लंडविरुद्ध अफगाणिस्तान संघासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. या वेगवान गोलंदाजाने अफगाणिस्तानसाठी फक्त ७ वनडे खेळले आहेत, ज्यात त्याने २५.४२च्या सरासरीने १४ विकेट घेतल्या आहेत.

Story img Loader