German Model Lizlaz on Virat Kohli: जर्मन मॉडेल लिझलॅजने विराट कोहलीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिनं सांगितले की, विराटच्या विरोधात बोलून त्याची बदनामी करण्यासाठी तिला पैशांची ऑफर देण्यात आली होती. लिझलाजने एका मुलाखतीत हा खुलासा केला. या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहलीने तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोला लाईक केल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चांना उधाण आलं आणि अवघ्या काही वेळेत ती व्हायरलदेखील झाली. यानंतर आता काही दिवसांना लिझलॅजने एक खुलासा केला, जो चर्चेचा विषय बनला.
विराट कोहली हा इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू आहे. त्याचे २७३ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. चाहते इन्स्टाग्रामवर त्याच्या प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवून असतात. विराट कोहली सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी तो अधूनमधून पोस्ट शेअर करत असतो.
फिल्ममंत्राला दिलेल्या मुलाखतीत लिझलॅजने खुलासा केला की, फोटो लाईक करण्याच्या प्रकरणानंतर देशातील अनेक माध्यमांनी तिच्याशी संपर्क साधून विराटविरुद्ध बोलण्यास सांगितलं. त्याला नकारात्मक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी तिला पैशांची ऑफरही देण्यात आली होती. मात्र, या जर्मन मॉडेलने त्या ऑफर्स नाकारल्या. तिने सांगितलं की, विराट तिचा आवडता क्रिकेटपटू आहे आणि ती त्याच्याविरुद्ध कधीही बोलणार नाही. लिझलॅजने असंही सांगितले की, जेव्हा विराटने तिची इन्स्टाग्राम रील लाईक केला, तेव्हा ती खूप भावुक झाली आणि तिला आश्चर्य वाटलं.
मॉडेल लिझलॅज विराट कोहलीबाबत नेमकं काय म्हणाली?
लिझलॅज म्हणाली, “त्या गोष्टीमुळे मला खूप आनंद झाला होता आणि मी थोडी भावूकही झाले होते. पण एवढं सगळं घडेल, याची मी कधीच अपेक्षा केली नव्हती. विविध मासिकं आणि माध्यमांकडून मला सतत फोन येऊ लागले. काही लोक तर मला जबरदस्तीने अशा गोष्टी बोलायला लावत होते, ज्या मला बोलायच्याच नव्हत्या. काही पत्रकारांनी तर विराट कोहलीबद्दल वाईट बोलण्यासाठी आणि त्याने कधीच न केलेल्या गोष्टींचे आरोप करण्यासाठी मला पैशांची ऑफरही दिली. पण मी असं का करेन? मी स्वतः सांगितलं होतं की विराट माझा आवडता क्रिकेटपटू आहे. मग पैशांसाठी मी त्याच्याबद्दल चुकीचं का बोलू? मी तशी व्यक्ती नाही.”
लिझालॅजने विराट कोहलीला आशियाचा मेस्सी आणि रोनाल्डो म्हटलं आहे. त्याची लोकप्रियता आणि प्रभाव लक्षात घेऊन तिने हे विधान केलं. ती पुढे म्हणाली की, विराटशी संबंधित एखादी छोटी घटनासुद्धा इथे मोठी ब्रेकिंग न्यूज बनते. जगभरात विराटला मिळणारी क्रेझ आणि चाहता वर्ग उल्लेखनीय आहे.
