scorecardresearch

“भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या खायला घाला”; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला सल्ला

याबरोबरच तो म्हणाला की पाकिस्तानी संघाने विराट कोहलीला इन्स्टाग्राम वापरण्यापासून रोखलं पाहिजे.

“भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या खायला घाला”; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला सल्ला

‘आयसीसी’ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज भारत आणि पाकिस्तान दुबईत एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्याच्या निमित्ताने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानी संघाला शुभेच्छा देतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने भारताविरुद्धच्या या सामन्यासाठी एक खोचक सल्लाही संघाला दिला आहे.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर चेष्टेत म्हणाला की बाबर आजम आणि त्याच्या संघाने भारतीय संघाला सामन्याच्या अगोदर झोपेच्या गोळ्या द्यायला हव्यात. याबरोबरच तो म्हणाला की पाकिस्तानी संघाने विराट कोहलीला इन्स्टाग्राम वापरण्यापासून रोखलं पाहिजे आणि महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीसाठी क्रीजवर उतरण्यापासून रोखायला हवं.

हेही वाचा – पाहा भारत-पाकिस्तान मॅच लाईव्ह! कुठे आणि कधी? जाणून घ्या…

शोएब अख्तर म्हणाला, सगळ्यात आधी भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या द्या. विराट कोहलीला इन्स्टाग्राम वापरण्यापासून रोखा आणि तिसरा असा प्रयत्न करा की महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला येणार नाही. मी तुम्हाला सांगतो की तो जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे आणि सध्या चांगलाच फॉर्मात आहे.

यानंतर शोएब अख्तरने काही गंभीर मुद्द्यावरही चर्चा केली आहे. त्याने पाकिस्तानच्या सलामी फलंदाजांना सल्ला दिला की त्यांनी धमाकेदार सुरुवात करावी. स्पोर्ट्सकीडासोबत बोलताना त्याने सांगितलं की सलामीच्या फलंदाजानी कमीतकमी डॉट बॉल खेळायला हवेत. त्याचबरोबर गोलंदाजांना सल्ला देत तो म्हणाला की बचावात्मक खेळी करतानाच अधिक आक्रमक होत गोलंदाजी करा.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 13:41 IST

संबंधित बातम्या