New Zealand vs England, Glenn Phillips Flying Catch: इंग्लंडचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना हॅगली ओव्हलवर खेळवला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. फिलिप्सने उंच उडी घेत असा अप्रतिम झेल घेतला की सगळेच थक्क झाले.
न्यूझीलंडचा संघ पहिल्या कसोटीत ३४८ धावा करत सर्वबाद झाला. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडच्या हॅरी ब्रुक आणि ऑली पॉपने १५१ धावांची भागीदारी रचत मोठी धावसंख्या उभारली. हॅरी ब्रुकने या कसोटीत आपले ७वे कसोटी शतक झळकावले. ब्रुक आणि पोपने किवी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होते. पॉप ७७ धावांवर खेळत होता. फॉर्मात असलेल्या पोपने पुढच्या चेंडूवर पुन्हा चौकार लगावण्यासाठी गेला आणि तितक्यात फिलीप्सने हवेत झेप घेत त्याला झेलबाद केले.
हेही वाचा – Champions Trophy: “२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान…”, शाहीद आफ्रिदीने BCCI ला सुनावलं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य
ओली पोप ७७ धावा करून बाद झाला पण त्याचा सहकारी हॅरी ब्रूकने शतक झळकावून किवी संघाला अडचणीत आणले आहे. पोप गेल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्ससह तो वेगाने धावा काढत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ब्रुकने केवळ १६२ चेंडूत १३१ धावा केल्या आहेत. दुसऱ्या टोकाला स्टोक्स ७१ चेंडूत ३६ धावा करत फलंदाजी करत आहे. दोघांमध्ये अवघ्या १२४ चेंडूत ९५ धावांची भागीदारी झाली. त्याच वेळी, इंग्लंड संघाने ७४ षटकांमध्ये ५ विकेट गमावत ३१९ धावा केल्या आहेत आणि आता न्यूझीलंडपेक्षा फक्त २९ धावा मागे आहेत.