scorecardresearch

Turkey Earthquake: धक्कादायक…! टर्कीचा गोलकीपर अहमत इयुप तुर्कस्लानचा मृत्यू

Turkey Earthquake: ६ फेब्रुवारीला टर्कीमध्ये भूकंप झाला. त्यानंतर ७ फेब्रुवारीला टर्कीच्या गोलकीपरच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी झाली. गोलरक्षक अहमत इयुप तुर्कस्लान सध्या येनी मालत्यास्पोर या क्लबकडून खेळत होता.

Goalkeeper Ahmet Eyup Death
तुर्कस्तानचा गोलकीपर अहमत इयुप (फोटो-ट्विटर)

टर्कीमध्ये भूकंपामुळे झालेला विध्वंस कोणापासून लपलेला नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. किती बेघर झाले माहीत नाही. तरीही अनेक जण आहेत, ज्यांचा ठावठिकाणा कळू शकलेला नाही. या भूकंपात तुर्कीने आपला एक फुटबॉलपटू गमावला आहे. या भूकंपात २८ वर्षीय गोलरक्षक अहमत इयुप तुर्कस्लानचा मृत्यू झाला.

६ फेब्रुवारीला टर्कीमध्ये भूकंप झाला आणि ७ फेब्रुवारीला टर्कीच्या गोलकीपरच्या मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी झाली. गोलरक्षक अहमत इयुप तुर्कस्लान सध्या येनी मालत्यास्पोर या क्लबकडून खेळत होता. या क्लबसोबत त्यांचा एक वर्षाचा करार होता. पण, करार संपण्यापूर्वीच टर्कीच्या गोलरक्षकाचे निधन झाले.

१० वर्षात खेळले ८७ सामने –

वरिष्ठ स्तरावरील अहमत इयुप तुर्कस्लानची फुटबॉल कारकीर्द १० वर्षाची राहिली. यादरम्यान त्याने ५ क्लबसाठी ८७ सामने खेळले. गोलरक्षकाचा मृत्यू देखील हृदय पिळवटून टाकणारा आहे. कारण तो विवाहित होता. त्याच्या वयानुसार त्याच्यामध्ये अजूनही बरेच फुटबॉल शिल्लक होते.

गोलरक्षकाच्या मृत्यूमुळे क्लबमध्ये पसरली शांतता –

गोलरक्षक अहमतच्या मृत्यूनंतर त्याच्या क्लबच्या खेळाडूंमध्ये शांतता आहे. डगआउटमध्ये क्लब त्याला खूप मिस करेल. यापूर्वी भूकंपात आणखी एक फुटबॉलपटू बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. ख्रिश्चन अष्टू नावाच्या फुटबॉलपटूबद्दल चांगली बातमी म्हणजे तो आता सापडला आहे. भूकंपात त्यांच्यासोबत कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 13:56 IST
ताज्या बातम्या