जगातील प्रत्येक गोष्ट देवाच्या चरणाशी जोडलेली असते असं म्हणतात. माणसा-माणसांमध्येही देव असतो आणि देवासारखीच माणसं असतात, असंही काही जणांचं मत असतं. परंतु, खेळाच्या मैदानात कधी देवाचं दर्शन झालंय का? या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडे नक्कीच असेल, कारण १५ नोव्हेंबर १९८९ चा दिवस उजाडला आणि क्रिकेटच्या मैदानात देवच अवतरला. त्याचं नाव आहे ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन रमेश तेंडुलकर. अवघ्या 16 वर्षांचा असताना सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पाकिस्तानच्या मैदानात सचिननं दिग्गज गोलंदाजांचा सामना केला अन् बघता बघता आख्ख्या विश्वात सचिनने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्यात सचिनने पहिल्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सचिनचं पदार्पण अविस्मरणीयच नव्हतं, तर सचिनच्या अप्रतिम फलंदाजीमुळं तो जगातील दिग्गज क्रिकेटर बनेल याचे संकेतही दिले. त्यावेळी सचिनचा सामना दिग्गज गोलंदाजांसोबत झाला. यामध्ये अब्दूल कादीर, वासिम आक्रम, इमरान खान आणि वकार युनिस या गोलंदाजांचा समावेश होता. सचिननं फक्त १६ वर्षांचा असताना पाकिस्तानच्या मैदानात धावांचा पाऊस पाडला. चार कसोटी सामन्यात सहा इनिंग्समध्ये सचिनने ३५.८३ च्या सरासरीनं २१५ धावा कुटल्या. त्याने पाकिस्तान दौऱ्यात दोन अर्धशतक ठोकले. ५९ धावांची खेळी सचिनची सर्वोत्तम धावसंख्या होती.

आणखी वाचा – हार्दिक पांड्या कर्णधार झाला तरी टीम इंडियावर संकट…इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं ‘हे’ कारण

त्यानंतर याच दौऱ्यात सचिनने डिसेंबरमध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र, या सामन्यांमध्ये सचिनला चमकदार कामगिरी करता आली नाही. पण जसजसे वर्ष पालटल गेले, सचिनने क्रिकेटच्या मैदानात यशाचं उंच शिखर गाठलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यांतही सचिनने स्टार लेग स्पीनर शेन वॉर्नचा अनेकदा धुव्वा उडवला होता. एव्हढच नाही तर त्याने पाकिस्तानचा रावलपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरच्या गोलंदाजीचाही समाचार घेतला.

2003 च्या विश्वचषकात शोएबच्या गोलंदाजीवर सचिनने जबरदस्त अप्पर कट फटक्याने मारलेला सिक्स आजही क्रिकेट प्रेमींच्या भुवया उंचावतो. सचिनने अनेक खेळपट्ट्यांवर रचलेला धावांचा डोंगर आपल्याला माहितच आहे, पण 2011 चा एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्डकप जिंकल्यानं सचिनचा आनंद द्विगुणीत झाला.

आणखी वाचा – ICC World Cup 2023: भारत आता एकटा टायगर, भूषवणार वर्ल्डकपचं यजमानपद, ‘या’ दहा शहरांमध्ये रंगणार सामन्यांचा थरार

सचिन तेंडुलकरची अनेक विक्रमांना गवसणी

सचिनने २०० कसोटी सामने खेळून ५३.७८ च्या सरासरीनं तब्बल १५९२१ धावा कुटल्या. यामध्ये ५१ शतकांचा समावेश असून ६८ अर्धशतकांची खेळी सचिनने साकारली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये २४८ धावा ही सचिनची सर्वोत्तम धावसंख्या आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारण्यात सचिन अग्रस्थानी आहे. लिटल मास्टर सचिनने वनडे फॉर्मेटमध्येही अप्रतिम कामगिरी केलीय. त्याने खेळलेल्या ४६३ सामन्यांमध्ये ४४.८३ च्या सरासरीनं सचिनने १८४२६ धावा कुटल्या आहेत. यामध्ये ४९ शतक आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेट मध्ये सचिनने डबल सेंचूरी ठोकत २०० धावा केल्या. ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. सचिन एकदिवसीय क्रिकेटमध्येही सर्वाधिक धावसंख्या करण्यात अव्वल स्थानी आहे. सचिनने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ३४३५७ धावा केल्या आणि वैयक्तीक १०० शतकं ठोकून सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावसंख्या उभारण्याच्या यादीत नाव कोरलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: God of cricket sachin tendulkar made his international cricket debut on this day became worlds no one batsman nss91
First published on: 15-11-2022 at 17:37 IST