भारताचा राष्ट्रीय कुमार विजेता अमन इंदोरा याने बाकू (अझरबैजान) येथे झालेल्या अगालरोव्ह चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
अमन याने ५६ किलो विभागातील अंतिम लढतीत उजबेकिस्तानच्या अब्दुलजाबोरोव्ह अझिझबेक याला ४-१ असे पराभूत केले. भारताच्या ए.सिलाम्बरासन (५२ किलो) व कैलास गिल (७५ किलो) यांनीही अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ८१ किलो विभागात भारताच्या अभिषेक बेनीवाल याला कांस्यपदक मिळाले.
सिलाम्बरासन याला अंतिम लढतीत अझरबैजानच्या युसिफुदा मासूद याने ३-२ असे पराभूत केले. मासूदचा सहकारी झाकिरोव्ह रोमान याने कैलासवर ५-० असा दणदणीत विजय मिळविला. या स्पर्धेत भारताचे सहा खेळाडू सहभागी झाले होते.        

Story img Loader