टी-२० विश्वचषक २००७ हा भारत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक संस्मरणीय क्षण आहे. २००७ विश्वचषक हा पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक होता, ज्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. हे आता इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवले गेले आहे. परंतु तुम्हाला हा सुंदर क्षण केवळ हायलाइट्समध्येच नाही तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. कारण लवकरच या स्पर्धेवर एक डॉक्युमेंट्री वेब सिरीज बनवली जाणार आहे. जे इंटरनॅशनल प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली चित्रित होत आहे.

टी-२० विश्वचषक २००७ वर बनवली जाणारा वेब सिरीज –

या माहितीपट मालिकेचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्याची अधिकृत घोषणा नक्कीच झाली आहे. या मालिकेत टी-२० विश्वचषक २००७ मध्ये सहभागी झालेल्या १५ खेळाडूंची भूमिका साकारण्यात येणार आहे. या मालिकेत विश्वचषकाचे रिअल आणि रील असे दोन्ही फुटेज असतील. या मालिकेचा एक तृतीयांश भाग शूट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा – विराट कोहली सहकारी खेळाडूंसोबत शॉपिंगसाठी पाकिस्तानला गेला होता का? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

यूके स्थित प्रोडक्शन फर्म वन वन सिक्स नेटवर्क २००७ च्या टी-२० विश्वचषक वेब सीरिजची निर्मिती करत आहे. जी गौरव बहिरवाणीची कंपनी आहे. या मालिकेचे दिग्दर्शन आनंद कुमार करत आहेत, ज्यांनी यापूर्वी दिल्ली हाइट्स आणि जिल्हा गाझियाबाद सारखे चित्रपट केले आहेत. आणि या मालिकेचे लेखक सौरभ एम पांडे आहेत, ज्यांनी द काश्मीर फाइल्स, द ताश्कंद फाइल्स, वाणी यांसारख्या चित्रपटांची कथा लिहिली आहे. या मालिकेत मोठे कलाकार भारतीय क्रिकेटपटूंच्या भूमिकेत असून ही मालिका पुढील वर्षाच्या मध्यात प्रदर्शित होणार आहे.