मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळख असणाऱ्या ए. बी. डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून केली आहे. डिव्हिलियर्सच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. त्याने अचानक हा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल नेटवर्किंगवर त्याच्यासंदर्भातील अनेक पोस्ट केल्या आहेत. मात्र डिव्हिलियर्सच्या चाहत्यांमध्ये काही खास नावांचाही समावेश आहे. अर्थात डिव्हिलियर्सचा आयपीएलमधील कर्णधार आणि संघ सहकारी असणाऱ्या विराटने यावर प्रतिक्रिया दिलीय. पण त्याचबरोबरच माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हणजेच सुंदर पिचाई यांनीही डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया नोंदवलीय.

नक्की वाचा >> डिव्हिलियर्सच्या निवृत्तीमुळे कोहली झाला भावूक; म्हणाला, “भावा, मला तुझ्या या निर्णयाचा फार त्रास होतोय पण…”

हा प्रवास फार भन्नाट होता मात्र मी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय, अशी आपल्या पोस्टला सुरुवात करत डिव्हिलियर्सने सर्व चाहत्यांचे आभार मानत आपण यापुढे कोणत्याही स्पर्धेत खेळणार नसल्याचं सोशल मीडियावरुन स्पष्ट केलं आहे. ए. बी. डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर वेगवेगळ्या क्षेत्रांची लोकांच्या प्रतिक्रिया येत असतानाच भारतीय वंशाच्या सुंदर पिचाई यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. डिव्हिलियर्सचं हे निवृत्तीचं ट्विट कोट करुन रिट्विट करत पिचाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

नक्की पाहा हे फोटो >> चहाप्रेम, क्रिकेटचं वेड, व्यायामाचा आळस अन्… Typical भारतीय आहेत Google चे CEO

या व्यक्तीचा वारसा फार मोठा आहे (What a legacy), त्याची कारकिर्द फारच उत्तम आहे. आतापर्यंतच्या माझ्या सर्वात आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे हा, अशा अर्थाचं ट्विट पिचाई यांनी केलं आहे.

पिचाई यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. याबद्दल ते अनेकदा उघडपणे बोलले आहेत. काही वर्षांपूर्वी ते भारत दौऱ्यावर आले असताना दिल्लीमधील एका मैदानात क्रिकेटही खेळले होते. अनेकदा पिचाई क्रिकेटमधील महत्वाच्या घडामोडींवर कार्यक्रमांमध्ये किंवा सोशल नेटवर्कींगवरुन बोलताना दिसतात. आज डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन त्यांचं क्रिकेटवरील प्रेम पुन्हा अधोरेखित झालं आहे.

नक्की वाचा >> Sexting Scandal मुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये मोठा भूकंप; टीप पेनने सोडलं कर्णधार पद

मागील तीन वर्षांपासून डिव्हिलियर्स त्याच्या राष्ट्रीय संघामधून खेळला नसला तरी तो आरसीबीसाठी खेळत होता. २०२१ च्या आयपीएलमध्ये तो आरसीबीसाठी १५ सामने खेळला. यामध्ये त्याने ३१.३० च्या सरासरीने ३१३ धावा केल्या. आता त्याने निवृत्तीची घोषणा केल्याने तो आयपीएलही खेळणार नाहीय. आयपीएलमध्ये त्याने एकूण ५ हजार १६२ धाव केल्या आहेत. तो आयपीएलच्या १८४ सामने खेळा असून त्याची सरासरी ३९.७० इतकी आहे. त्याचा स्ट्राइक रेट १५१.६८ इतका आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्व पर्वांचा विचार केल्यास सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल २० खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे.