scorecardresearch

SAT20 League: एमएस धोनी सोबत मुंबईत पोहोचला ग्रॅम स्मिथ; ‘हा’ संघ होणार भारतात लॉन्च

दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्स संघ देखील आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्ज प्रमाणे खेळताना दिसणार आहे.

SAT20 League: एमएस धोनी सोबत मुंबईत पोहोचला ग्रॅम स्मिथ; ‘हा’ संघ होणार भारतात लॉन्च
ग्रॅम स्मिथ आणि एमएस धोनीने भारतात दाखल (फोटो-सोशल मीडिया)

दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचा पहिला हंगाम पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने तयारी सुरू केली आहे. त्याच वेळी, त्याचे वेळापत्रक आधीच केले आहे. या दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्स संघ देखील आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्ज प्रमाणे खेळताना दिसणार आहे. ज्याचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि कोच स्टीफन फ्लेमिंग आहे.

गुरुवारी माजी आफ्रिकन क्रिकेटर ग्रॅम स्मिथने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये धोनीसह इतर काही लोक दिसत आहेत. वास्तविक, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एमएस धोनी आणि ग्रॅम स्मिथ मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. कारण जोहान्सबर्ग सुपर किंग्जचा संघ भारतात लॉन्च होणार आहे, ज्याची मालकी इंडिया सिमेंट्सकडे आहे.

स्पर्धेत सहभागी असलेले संघ –

मुंबई इंडियन केप टाउन (रिलायन्स), प्रिटोरिया कॅपिटल्स (जेएसडब्ल्यू), पार्ल रॉयल्स (रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुप), डर्बन सुपर जायंट्स (आरपीजी-संजीव गोएंका), जोहान्सबर्ग सुपर किंग्स (इंडिया सिमेंट्स), सनरायझर्स इस्टर्न केप (मालक काविया मारन).

जोहान्सबर्ग सुपर किंग्स: फाफ डु प्लेसिस, जेराल्ड कोएत्झी, महेश थिक्शाना, रोमारियो शेफर्ड, हॅरी ब्रूक, जेम मलान, रीझा हेंड्रिक्स, काइल व्हेरिन, जॉर्ज गार्टेन, अल्झारी जोसेफ, लुईस डु प्लॉय, लुईस ग्रेगरी, लिझाड विल्यम्स, डोनाव्हन फेरेरा, नांद्रे बर्जर, मालुसी सिबोटो, कालेब सेलेका.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:02 IST

संबंधित बातम्या