अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे गुरुवारी भव्य उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेसारख्या युवा क्रीडा उत्सवांमधून भावी ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास या उद्घाटन सोहळय़ादरम्यान पंतप्रधानांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या भव्य सोहळय़ात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे महासचिव राजीव मेहता उपस्थित होते. त्यांच्यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पीव्ही सिंधू, नेमबाज गगन नारंग यांचीही या सोहळय़ाला उपस्थिती होती. या सोहळय़ात गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा गुरुवारी पार पडला असला, तरी काही क्रीडाप्रकारांना यापूर्वीच सुरुवात झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grand inauguration national sports competition prime minister narendra modi ysh
First published on: 30-09-2022 at 00:02 IST