IPL 2026 GT vs MI Highlights: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३० वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिल्या डावात १९९ धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने दमदार शतकी खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सचा डाव अवघ्या १०० धावांवर आटोपला. हा सामना मुंबई इंडियन्सने ९९ धावांनी आपल्या नावावर केला. मुंबईकडून गोलंदाजी करताना अश्वनी कुमारने सर्वाधिक ४ गडी बाद केले.

Live Updates

GT vs MI  IPL 2026 Highlights: पाहा गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे हायलाईट्स

23:21 (IST) 20 Apr 2026

GT vs MI Live: तिलक वर्माचं दमदार शतक अन् अश्वनी कुमारचा भेदक मारा; मुंबई इंडियन्सचा गुजरातवर ९९ धावांनी ऐतिहासिक विजय

गुजरात टायटन्सला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातचा डाव अवघ्या १०० धावांवर आटोपला. यासह मुंबई इंडियन्सने हा सामना ९९ धावांनी आपल्या नावावर केला.

22:38 (IST) 20 Apr 2026

GT vs MI Live: गुजरातला सहावा धक्का

गुजरात टायटन्सला सहावा धक्का बसला आहे. अश्वनी कुमारने राहुल तेवतियाला बाद करत माघारी धाडलं आहे.

22:21 (IST) 20 Apr 2026

GT vs MI Live: मिचेल सँटनरची कमाल! एकाच षटकात २ फलंदाजांना धाडलं माघारी

मिचेल सँटनरने आपल्या पहिल्याच षटकात आधी वॉशिंग्टन सुंदर आणि त्यानंतर ग्लेन फिलिप्सला बाद करत माघारी धाडलं.

22:02 (IST) 20 Apr 2026

GT vs MI Live: शुबमन गिल परतला माघारी! गुजरात टायटन्सला तिसरा मोठा धक्का

मुंबई इंडियन्सने पावरप्लेमध्येच गुजरातला तिसरा मोठा धक्का दिला आहे. अश्वनी कुमारने गिलला बाद करत माघारी धाडलं आहे.

21:38 (IST) 20 Apr 2026

GT vs MI Live: अखेर खातं उघडलं! २० व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बुमराहला मिळाली विकेट

जसप्रीत बुमराहला या हंगामातील एकाही सामन्यात विकेट घेऊ शकला नव्हता. पण स्पर्धेतील २० व्या षटाकातील पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट मिळवून दिली आहे. साई सुदर्शन पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे.

21:21 (IST) 20 Apr 2026

GT vs MI Live: तिलक वर्माचं दमदार शतक! मुंबईने गुजरातसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना तिलक वर्माने नाबाद १०१ धावांची खेळी केली. यासह मुंबईने गुजरातसमोर विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले आहे.

21:00 (IST) 20 Apr 2026

GT vs MI Live: तिलक वर्माचं दमदार अर्धशतक!

मुंबई इंडियन्सला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. पण तिलक वर्माने ३३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण करून मुंबईचा डाव सावरला आहे.

20:30 (IST) 20 Apr 2026

GT vs MI Live: नमन धीरचं अर्धशतक हुकलं! रबाडाने घेतला भन्नाट कॅच, मुंबईचे ४ फलंदाज तंबूत

नमन धीरकडे अर्धशतक झळकावण्याची संधी होती. पण प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर तो ४५ धावा करून माघारी परतला.

20:01 (IST) 20 Apr 2026
GT vs MI Live: मुंबई इंडियन्सची फ्लॉप सुरुवात! टॉप-३ फलंदाज तंबूत; सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा स्वस्तात बाद

मुंबई इंडियन्सला तिसरा मोठा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव अवघ्या १५ धावा करून माघारी परतला आहे.

19:48 (IST) 20 Apr 2026
GT vs MI Live: रबाडाच्या गोलंदाजीवर क्विंटन डीकॉक परतला माघारी

गेल्या सामन्यात क्विंटन डीकॉकने दमदार शतक झळकावलं होतं. पण या सामन्यात तो अवघ्या १३ धावा करून माघारी परतला आहे.

19:45 (IST) 20 Apr 2026

GT vs MI Live: मुंबई इंडियन्सला पहिला मोठा धक्का! दानिश मलेवर स्वस्तात परतला माघारी

मुंबई इंडियन्सला पहिला मोठा धक्का बसला. आहे. पहिलाच सामना खेळत असलेला दानिश मलेवर २ धावा करून माघारी परतला आहे.

19:07 (IST) 20 Apr 2026

रोहित शर्मा आजच्या सामन्यातही नाहीच

हिटमॅन रोहित शर्मा या लढतीतही खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

19:05 (IST) 20 Apr 2026

दानिश मालेवार आणि क्रिश भगत पदार्पण करणार

मुंबई इंडियन्स संघाने विदर्भवीर दानिश मालेवार आणि वेगवान गोलंदाज क्रिश भगत यांंना पदार्पण देण्याचा निर्णय घेतला आहे.

19:02 (IST) 20 Apr 2026
गुजरात टायटन्सने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला.

18:42 (IST) 20 Apr 2026

मुंबई संघात मोठे बदल होणार?

सातत्याने पराभव होत असल्यामुळे संघाबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील असं मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने म्हटलं होतं. गुजरातविरुद्धच्या सामन्यात मुंबई संघव्यवस्थापन कठोर निर्णय घेतं का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

18:24 (IST) 20 Apr 2026

MI VS GT: गुणतालिकेत तळाशी आणि पराभवाच्या गर्तेत

मुंबई इंडियन्सने १३ वर्षानंतर हंगामातील पहिलाच सामना जिंकण्याची करामत केली. मात्र त्यानंतर ते पराभवाच्या गर्तेत सापडले आहेत. सद्यस्थितीत मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत तळाशी आहे. ५ पैकी ४ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. चाचपडत सुरुवात करून नंतर लय सापडणं हे मुंबईच्या संघाचं वैशिष्ट्य आहे. मात्र यंदा पंजाब, बंगळुरू, दिल्ली हे संघ फॉर्मात आहेत. त्यामुळे बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईला कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

18:18 (IST) 20 Apr 2026

रोहित शर्मा खेळणार?

मुंबईचा राजा रोहित शर्मा दुखापतीतून सावरून पुनरागमन करणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

mumbai indians

GT vs MI  IPL 2026: पाहा गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे हायलाईट्स.