IPL 2026 Qualifier 2 Match Gujarat Titans vs Rajasthan Royals Highlights: गुजरात टायटन्सनने राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने ८ चेंडू राखून मोठा पराभव केला, या पराभवासह गुजरातने तिसऱ्यांदा फायनल गाठली आहे. साई सुदर्शन व शुबमन गिल गुजरातच्या विजयाचे हिरो ठरले. या विजयासह गुजरात टायटन्स आता ३१ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध अंतिम सामना खेळेल.
IPL 2026 GT vs RR Qualifier-2 Highlights: आयपीएल २०२६ गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरचे हायलाईट्स
गुजरात टायटन्सनने राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने ८ चेंडू राखून मोठा पराभव केला, या पराभवासह गुजरातने तिसऱ्यांदा फायनल गाठली आहे. साई सुदर्शन व शुबमन गिल गुजरातच्या विजयाचे हिरो ठरले. या विजयासह गुजरात टायटन्स आता ३१ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध अंतिम सामना खेळेल.
GT vs RR Cricket Live Score: वॉशिंग्टन सुंदर बाद
नांद्रे बर्गरने १८ षटकाच्या पहिल्याचे चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी गेलेल्या वॉशिंग्टन सुंदरला झेलबाद केलं. यासह आता गुजरातला विजयासाठी १८ चेंडूत १४ धावांची गरज आहे.
GT vs RR Cricket Live Score: गिल क्लीन बोल्ड
शतकी खेळी साकारलेला शुबमन गिल आर्चरच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होत माघारी परतला. गिलने या सामन्यात ५३ चेंडूत १५ चौकार व ३ षटकारांसह १०५ धावांची खेळी केली.
कर्णधार शुबमन गिलने महत्त्वाच्या सामन्यात शतक झळकावलं. गिलचं आयपीएल प्लेऑफ इतिहासातील सर्वात जलद शतक आहे. गिलने ४७ चेंडूत १५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं आहे. यासह आता गुजरातला विजयासाठी फक्त ४० धावांची गरज आहे.
GT vs RR Cricket Live Score: साई सुदर्शन हिटविकेटवर आऊट
साई सुदर्शन १३व्या षटकात हिट विकेटवर बाद झाल्याने राजस्थानला पहिली विकेट गिफ्ट म्हणून मिळाली. बृजेश शर्माच्या षटकात बॅट जोरात फिरवत त्याने फटका खेळला आणि चेंडू चौकारासाठी गेला, पण हातात सुटलेली बॅट विकेटवर जाऊन आदळली. यासह सलग दुसऱ्या सामन्यात साई सुदर्शन हिट विकेटवर बाद झाला. साई बाद झाल्याचं पाहून शुबमन गिल मैदानावर बसत त्याने डोकं खाली टेकवलं. गुजरातचा संघ सध्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
GT vs RR Cricket Live Score: साई सुदर्शनचं अर्धशतक
साई सुदर्शनने २६ चेंडूत १ षटकार व ४ चौकारांसह अर्धशतक झळकावलं आहे. यासह दोन्ही खेळाडूंनी १३४ धावांची भागीदारी रचली आहे. आता गुजरातला विजयासाठी ५८ चेंडूत ८१ धावांची गरज आहे.
GT vs RR Cricket Live Score:गिल-सुदर्शनचं अर्धशतक
शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी ५३ चेंडूत शतकी भागीदारी साकारली आहे. दोघांनी शतकी भागीदारीसह या सामन्यात राजस्थानला बॅकफूटवर टाकलं आहे. यादरम्यान ३० चेंडूत शुबमन गिल अर्धशतकदेखील झळकावलं आहे. यासह ९ षटकांत गुजरातनेही १०० धावांचा पल्ला पार केला.
बर्गरच्या चौथ्या षटकात साई सुदर्शनने मोठा फटका खेळला आणि फरेरा झेल टिपण्यासाठी मागच्या दिशेने धावत गेला आणि झेल सुटला. ज्याचा आता राजस्थानला चांगलाच फटका बसला आहे. त्यानंतर त्याने पुढच्या चेंडूवर चौकार खेचला. यानंतर आता ५ षटकांत संघाने ५९ धावा केल्या आहेत.
शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी मोठ्या लक्ष्यासमोर खेळताना गुजरातला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. आर्चरच्या पहिल्या षटकात दोघांनी ४ चौकारांसह १९ धावा कुटल्या, तर दुसऱ्या षटकात बर्गरने १२ धावा दिल्या. यासह त्यांनी ३ षटकांत बिनबाद ४१ धावा केल्या आहेत.
GT vs RR: 'बॉस बेबी' वैभव सूर्यवंशीचा IPLमध्ये जलवा! जगातील सर्व खेळाडूंना मागे टाकत 'ही' कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
GT vs RR Cricket Live Score: डोनावर फरेराचं वादळ
वैभव सूर्यवंशीनंतर मैदानावर आलेल्या डोनावन फरेरा वादळी फटकेबाजी केली. फरेराने ११ चेंडूत ४ षटकार व २ चौकारांसह ३८ धावा कुटल्या आणि राजस्थानला २०० धावांचा पल्ला पार करून दिला. राशिद खानच्या अखेरच्या षटकात त्याने ४ षटकार खेचले. यासह राजस्थानने यासह २१४ धावांचा डोंगर उभारला. यासह गुजरातला विजयासाठी आयपीएलच्या प्लेऑफ इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या गाठत विजय मिळवायचा आहे.
सलग दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचं शतक हुकलं. गुजरातविरूद्ध सामन्यात वैभव ९६ धावांवर बाद झाला. गेल्या सामन्यात हैदराबादविरूद्ध वैभव मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात थर्ड मॅनजवळ बाद झाला, तर रबाडाच्या गोलंदाजीवर देखील वैभव त्या पद्धतीने थर्ड मॅनच्या फिल्डरला सोपा झेल देत माघारी परतला. बाद होताच वैभवने ओरडत स्वत:वर राग काढला. वैभवने ४७ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह ९६ धावा करत माघारी परतला.
GT vs RR Cricket Live Score: वैभव सूर्यवंशीच्या धावांना वेग
वैभव सूर्यवंशीने १६व्या षटकापासून धावांचा वेग वाढवला असून चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळत आहे. सर्वात चांगली गोलंदाजी केलेल्या होल्डरच्या षटकात त्याने दोन षटकार व एका चौकारासह १६ धावा कुटल्या.
वैभव सूर्यवंशीने गुजरातविरूद्ध ३१ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह आपलं अर्धशतक केलं. वैभवचं आयपीएलमधील हे सर्वात स्लो अर्धशतक आहे. वैभवने या अर्धशतकाचं बिलकुल सेलिब्रेशन केलं नाही. याउलट वैभव मान खाली घालून चालत नॉन स्ट्राईकर एन्डच्य दिशेने गेला.
GT vs RR Cricket Live Score: षटकार अन् आर्चर बाद
जोफ्रा आर्चरने १३व्या षटकात प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर आधी षटकार खेचला आणि पुढच्या चेंडूवर प्रसिध कृष्णाने माईंडगेम खेळत विकेट घेतली.
GT vs RR Live: दासुन शनाका झेलबाद
१२व्या षटकात जेसन होल्डरने गुजरातला अजून एक विकेट मिळवून दिली. दासुन शनाकाच्या ग्लोव्हजला लागत चेंडू बटलरच्या हातात गेला आणि गुजरातला चौथी विकेट मिळाली.
GT vs RR Cricket Live Score: रियान पराग स्वस्तात बाद
१०व्या षटकात जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कर्णधार रियान पराग झेलबाद झाला. पराग ११ धावा करत बाद झाला. यासह राजस्थानने १० षटकांत ३ बाद १०३ धावा केल्या आहेत.
GT vs RR Live: १०० धावा पूर्ण
नवव्या षटकात राजस्थान रॉयल्सने १०० धावांचा पल्ला पार केला आहे. रशीद खान ९वं षटक टाकण्यासाठी आला आणि जडेजा मैदानाबाहेर गेल्यानंतर रियान पराग मैदानावर आला. रियानने पहिल्या दोन चेंडूवर चौकार-षटकार लगावला. तर वैभवनेही एक षटकार लगावत संघाचा १०० धावांचा पल्ला गाठला.
८ षटकांनंतर संघाचा डाव सावरणारा रवींद्र जडेजा अचानक रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला. ८व्या षटकादरम्यान जडेजासाठी फिजिओदेखील मैदानावर आले होते. जडेजाच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत असल्याचं समजत आहे. फटका खेळताना त्याला त्रास होत असल्याने तो मैदानाबाहेर गेला आहे.
GT vs RR Cricket Live Score: पॉवरप्ले
गुजरात संघाने पॉवरप्लेची सुरूवात चांगली केल्यानंतर राजस्थानने पॉवरप्लेचा शेवट गोड केला. वैभव सूर्यवंशी व रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. सहाव्या षटकात प्रसिध कृष्णाची धुलाई करत १७ धावा कुटल्या आणि राजस्थानने पॉवरप्लेमध्ये २ बाद ७० धावा केल्या आहेत.
GT vs RR Cricket Live Score: ४ षटकांत किती धावा?
वैभव सूर्यवंशीने मोहम्मद सिराजच्या तिसऱ्या षटकात ३ चौकार लगावत २१ धावा कुटल्या. तर कगिसो रबाडाच्या कमालीच्या षटकातही चौकार-षटकार लगावत ११ धावा कुटल्या. यासह आता राजस्थानने ४ षटकांत २ बाद ४५ धावा केल्या आहेत.
GT vs RR Cricket Live Score: रबाडाच्या खात्यात दुसरी विकेट
कगिसो रबाडा दुसरं षटक टाकण्यासाठी आला आणि त्यानेही संघाला मोठी विकेट मिळवून दिली. रबाडाच्या षटकात शानदार चौकार मारत ध्रुव जुरेलने सुरूवात केली, पण पाचव्या चेंडूवर मोठा फटक खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह राजस्थानने २ षटकांत २ बाद १३ धावा केल्या आहेत.
GT vs RR Live: विकेटसह सामन्याला सुरूवात
राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्याला सुरूवात झाली आहे. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वालची जोडी उतरली आहे. तर मोहम्मद सिराजने पहिल्या षटकात विकेटने सुरूवात केली आहे. चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यशस्वी जैस्वाल झेलबाद झाला.
GT vs RR Live: गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन
साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज</p>
GT vs RR Playing 11: राजस्थान रॉयल्स प्लेईंग इलेव्हन:
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, दासून शनाका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, यशराज पुंजा
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्याची नाणेफेक राजस्थान संघाने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यासाठी नाणं २ वेळा उडावण्यात आलं, शुबमन गिल नाणं उडवत असताना रियानने हेड्स की टेल्स हे जोरात न बोलल्याने पुन्हा दुसऱ्यांदा नाणं उडवण्यात आलं. दुसऱ्यांदा नाणं उडवण्यात आल्याने शुबमन गिल वैतागलेला दिसला. गुजरातच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्यात आलं आहे.
RR vs GT: कुलवंत खेजरोलियाच्या जागी कोण खेळणार
क्वालिफायर१च्या लढतीत गुजरात टायटन्सने हंगामात एकही लढत न खेळलेल्या कुलवंत खेजरोलियाला खेळवलं होतं. पहिल्या षटकात अवघ्या तीन धावा देणाऱ्या कुलवंतच्या दुसऱ्या षटकात आरसीबीने २८ धावा चोपून काढल्या. अर्शद खानच्या जागी कुलवंतला संधी देण्यात आली होती. राजस्थानविरुद्ध कुलवंतच्या जागी अर्शद पुन्हा संघात परतू शकतो किंवा खेळपट्टी फिरकीला पोषक असल्यास मानव सुतार किंवा साईकिशोरला स्थान मिळू शकतं.
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांची टॉप३ बॅट्समनवर भिस्त आहे. राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल तर गुजरात टायटन्स शुबमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर या तिघांवर मोठी जबाबदारी आहे.
RR VS GT: गुजरात राजस्थान आमनेसामने रेकॉर्ड कसा?
यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स दोनवेळा एकमेकांसमोर उभे ठाकले. एक सामना गुजरातने जिंकला तर एक राजस्थानने. त्यामुळे पारडं समसमान आहे. प्लेऑफमधल्या क्वालिफायर१च्या लढतीत गुजरातला बंगळुरूविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्या सामन्यात झालेल्या चुकातून बोध घेत दमदार कामगिरी करण्यासाठी गुजरातचा संघ आतूर आहे.
RR VS GT: वैभव सूर्यवंशीला गुजरात कसं रोखणार?
झंझावाती फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीला कसं रोखायचं हा यक्षप्रश्न गुजरात टायटन्ससमोर आहे. एका हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम नावावर करणाऱ्या वैभवने हैदराबादविरुद्धचा सामना एकटाकी जिंकून दिला होता.

IPL 2026 GT vs RR Highlights: गुजरात टायटन्सनने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
