GT vs RR Toss Confusion Video: आयपीएल २०२६ मधील दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक झाली असून राजस्थान रॉयल्सने महत्त्वपूर्ण सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण या सामन्यादरम्यान एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला. नाणेफेकीसाठी उपस्थित असलेल्या मॅच रेफरीच्या आदेशावरून दोन वेळा नाणं उडवण्यात आलं. आता मैदानावर नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊया.
दुसऱ्या क्वालिफायर सामन्यासाठी गुजरातचा कर्णधार शुबमन गिल, राजस्थानचा कर्णधार रियान पराग व सामनाधिकारी प्रकाश भट्ट उपस्थित होते. शुबमन गिलने नाणं उडवलं आणि रियान परागने छापा असा कॉल केला, पण त्याचा आवाज सामनाधिकाऱ्यांना स्पष्ट ऐकून आला नाही. पहिल्यांदा नाणं उडवल्यानंतर टेल्स आलं होतं, त्यामुळे गुजरातने नाणेफेक जिंकली होती. नाणे काटा पडल्याने शुबमन गिल पुढे सरकला, पण सामनाधिकारींनी त्याला थांबवले.
नाणं उडवल्यानंतर मॅच रेफरीने रियान परागचा कॉल ऐकू न आल्याचं सांगितलं. त्यामुळे नाणं पुन्हा उडवण्यास सांगितलं. दुसऱ्यांदा नाणं उडवत असल्याचं समालोचक रवी शास्त्री यांनी जाहीर केलं. शुबमन गिल मात्र या निर्णयामुळे नाराज दिसला. यावेळी रियान परागने जरा मोठ्या आवाजात ‘हेड्स’ म्हटलं आणि नाणे पडल्यानंतर त्याच्या नशीबाने त्याला साथ दिली व नाणेफेक जिंकली. ज्यानंतर त्याने लगेच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक गमावल्यानंतर रवी शास्त्री यांच्याशी बोलताना शुबमन गिलने कबुल केलं की, जर संघाने नाणेफेक जिंकली असती तर त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. पण, ४० षटकांच्या सामन्यात या खेळपट्टीमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. आमच्या संघात प्रत्येक परिस्थितीत खेळण्यासाठी खेळाडू आहेत. या सामन्यासाठी आम्ही प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला असून, साई किशोर संघात पुनरागमन परतला आहे.
गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन
साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज</p>
राजस्थान रॉयल्स प्लेईंग इलेव्हन:
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, दासून शनाका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, यशराज पुंजा
