Urvil Patel 36 balls century against Uttarakhand in SMAT 2024 : सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये गुजरातचा फलंदाज उर्विल पटेल धुमाकूळ घालत आहे. या फलंदाजाने मंगळवारी इंदूरमध्ये उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात ३६ चेंडूत शतक झळकावले. काही दिवसांपूर्वी उर्विलने सर्वात वेगवान टी-२० शतक झळकावणारा भारतीय फलंदाज बनून इतिहास रचला होता. आता त्याने ४१ चेंडूत ११५ धावांची नाबाद खेळी केली आणि गुजरातने उत्तराखंडवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला.

सलामी देताना उर्विल पटेलने २८० च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ८ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने नाबाद ११५ धावा केल्या. यावेळी त्याने ३६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. टी-२० मधील भारताचे हे चौथे जलद शतक आहे. आता उर्विलने नाबाद ११५ धावांच्या खेळीच्या जोरावर उर्विलने टी-२० मध्ये गुजरातच्या फलंदाजाचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा स्वतःचा विक्रम मोडला. याआधी उर्विलने ११३ धावा केल्या होत्या.

319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
Fan who caught Kane Williamson's sixer with one hand wins Rs 90 lakh prize in SA20 2025 Match
SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
Jasprit Bumrah Moment in BBL as Mark Waugh Points out Lockie Ferguson Unconventional Delivery Like Indian Pacer Video
VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा मोह

आयपीएल मेगा लिलावात राहिला अनसोल्ड –

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात उर्विल पटेलला कोणीही विकत घेतले नाही. पण या निराशेचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. काही दिवसांपूर्वी त्याने त्रिपुराविरुद्ध अवघ्या २८ चेंडूत शतक झळकावले होते. हे जगातील दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. सर्वात वेगवान शतकाचा विक्रम एस्टोनियाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे, ज्याने २७ चेंडूत शतक झळकावले होते. उर्विल पटेल जरी आयपीएलचा भाग आहे. २०२३ मध्ये तो गुजरात टायटन्सचा भाग होता. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यानंतर मग त्याला संघातून रिलीज करण्यात आले आणि नंतर कोणीही त्याला पुन्हा विकत घेतले नाही.

हेही वाचा – IND vs AUS : यशस्वी जैस्वाल विमानतळावर अडकला काचेच्या दारात, रोहित-शुबमनने मदत करण्याऐवजी केली टिंगल, पाहा VIDEO

गुजरातने अवघ्या १३.१ षटकांत गाठले लक्ष्य –

u

u

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने १८६ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात उर्विल पटेलच्या शानदार खेळीमुळे गुजरातने अवघ्या १३.१ षटकांत लक्ष्य गाठले. आर्या देसाईनेही १३ चेंडूत २३ धावा केल्या. उत्तराखंडच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. अग्रिम तिवारी हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ३ षटकात ५६ धावा दिल्या. उत्तराखंडच्या फलंदाजीबद्दल, बोलायचे झाले तर समर्थ आरने ३९ चेंडूत ५४ धावा, कुणाल चडेलने २७ चेंडूत ४३ धावा आणि आदित्य तरेने २६ चेंडूत ५४ धावा केल्या. गुजरातकडून विशाल जैस्वालने सर्वोत्तम गोलंदाजी करत ४ षटकांत ४ विकेट्स घेतल्या.

Story img Loader