Gujarat Giants vs Delhi Capitals,WPL 2026: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील १७ वा सामना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने ९ गडी बाद १७४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या सामन्यात निकाल लागला. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघांना विजय मिळवण्याची समान संधी होती. पण शेवटी गुजरात जायंट्सने ३ धावांनी बाजी मारली.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीला आलेल्या बेथ मुनीने ५८ धावांची खेळी करत दमदार सुरुवात करून दिली. तर सोफी डिवाईन १३ धावा करत माघारी परतली. तर अनुष्का शर्माने ३९ धावांची दमदार खेळी केली. तर ॲशले गार्डनर अवघ्या २ धावा करत माघारी परतली. जॉर्जिया वेहरहॅमने ११ धावांची खेळी केली. भारती फुलमलीने ३ धावा केल्या. कनिष्का आहुजाने ४ धावा केल्या. शेवटी तनुजा कन्वरने २१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर गुजरातने २० षटकांअखेर ९ गडी बाद १७४ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकण्यासाठी १७५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. शफाली वर्मा अवघ्या १४ आणि लिजेन ली ११ धावा करत माघारी परतली. लॉरा वोल्वार्ड्टने २४ धावा केल्या. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज अवघ्या १६ धावा करत माघारी परतली. शेवटी स्नेह राणाने २९ धावांची खेळी केली. तर निकी प्रसादने नाबाद ४७ धावांची खेळी केली.

शेवटच्या षटकात सामना फिरला

दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या षटकात ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना निकी प्रसादने पाहिल्याच चेंडूवर धावून २ धावा घेतल्या. त्यानंतर पुढील २ चेंडूंवर २ धावा आल्या. शेवटी दिल्लीचा लागोपाठ २ फलंदाज माघारी परतले. त्यामुळे दिल्लीला २० षटकांअखेर ८ गडी बाद १७१ धावा करता आल्या. दिल्लीने हा सामना अवघ्या ३ धावांनी गमावला.