Cricket World Cup-winning coach helped Gukesh D to win World Chess Championship : भारताच्या गुकेश दोम्माराजू याने बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये विजेता ठरला आहे. गुरूवार, १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या १४व्या निर्णायक सामन्यात त्याने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. याबरोबर गुकेश हा वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनला आहे.

गुकेशने काही दिवसांपूर्वी आपण मोठे होत असताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कार्णधार महेंद्र सिंग धोनी हा आपला आदर्श होता असं सांगितलं होतं. महत्वाची बाब म्हणजे जगज्जेता बनलेल्या गुकेशच्या विजयाचे क्रिकेट आणि धोनी या दोन्हींशी खास कनेक्शन समोर आलं आहे. गुकेशचा विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे त्याचे मेंटल कोच पॅडी उपटन यांनी धोनीला देखील विश्वविजेता होण्यास मदत केली होती. पॅडी उपटन यांनी २०११ मध्ये भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्डकप जिंकण्यात तसेच भारतीय हॉकी संघाला पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकण्यात मदत केली होती.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
Jasprit Bumrah Wins ICC Mens Player of the Month for December 2024 For exceptional performances in IND vs AUS test Series
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने पटकावला ICC चा खास पुरस्कार, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पाहिला गोलंदाज
Arshdeep Singh clean bowled to Ruturaj Gaikwad during MAH vs PUN match in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : अर्शदीपचा अफलातून स्पेल! ऋतुराजचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राच्या टॉप ऑर्डरला पाडली खिंडार, VIDEO व्हायरल
Mohammed Shami brilliant bowling for Bengal in Vijay Hazare Trophy ahead Champions Trophy 2025
Mohammed Shami : मोहम्मद शमी पुनरागमनासाठी सज्ज! पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
मृणालने ठाकूरनं 'पाणी' सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे. (Mrunal Thakur/ Instagram)
मृणाल ठाकूरनं ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं केलं कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, “राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुम्ही…”

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी तुमचा पहिला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामना खेळणे ही आव्हानात्मक बाब आहे. इतिहासातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू मानल्या जाणाऱ्या मॅग्नस कार्लसन याला देखील पहिला बुद्धिबळ चॅम्पियनशीपचा सामना खेळताना अडचणी आल्या होत्या. या स्पर्धेत खेळताना कौशल्यापेक्षाही खेळाडूच्या मानसिक स्थितीची परीक्षा घेतली जाते, असं सांगितलं जातं. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कँडिडेट स्पर्धा जिंकल्यानंतर गुकेशने मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक शोधण्यास सुरूवात केली आणि त्याने पॅडी उपटन यांच्याशी संपर्क साधला.

कोण आहेत पॅडी उपटन?

दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू राहिलेल्या उपटन यानी २००८ आणि २०११ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे मेंटल कंडिशनिंग आणि स्टॅटर्जीक लिडरशीप प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या कारकि‍र्दीतच भारतीय क्रिकेट संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली एकदीवसीय क्रिकेटचे विश्वविजेतेपद जिंकले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाला पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा २०२४ मध्ये कास्य पदक जिंकण्यात देखील मदत केली.

गुकेशला त्याची पहिली जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये डिंग लिरेनविरोधात दोन धक्के सहन करावे लागले. गुकेशला पहिल्या डावातच पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर अकराव्या डावात विजय मिळवलेल्या गुकेशला पुन्हा एकदा डिंगने १२व्या डावात धक्का दिला. पण गुकेशने यानंतर कमालीचा सय्यम दाखवत जोरदार पुनरागमन केले.

हेही वाचा>> D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास

u

गुकेशची तयारी कशी होती?

गुकेशच्या या स्पर्धेसाठीच्या तयारीबद्दल प्रशिक्षक उपटन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना काही महत्वाच्या बाबी उघड केल्या. ते म्हणाले की, “संपूर्ण स्पर्धेत स्वत:ला त्याने ज्या प्रकारे मॅनेज केलं त्याचा मला अभिमान आहे. त्याच्या पहिल्याच जागतिक चॅम्पियनशिपमध्ये १८ वर्षीय गुकेशने कमालीची परिपक्वता दाखवली. आम्ही त्याच्याकडून प्रत्येक चालीत किंवा प्रत्येक डावात परिपूर्ण खेळ किंवा १४ डावांची परिपूर्ण स्पर्धा खेळण्याची अपेक्षा कधीच केली नव्हती. तसे करणे शक्य नाही. त्याचे काही डाव खराब जातील, काही डाव जेमतेम तर काही डाव हे सर्वोत्तम असतील.”

ते पुढे बोलताना म्हणाले की, “जर तुम्हाला परीक्षेत चांगली कामगिरी करायची असेल तर संपूर्ण पुस्तकाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करावा लागेल. त्यानंतर तुम्ही आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकता. तुम्ही फक्त अपेक्षा घेऊन जाऊ शकत नाहीत. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गुकेशने संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास केला होता. त्याची झोप, त्याचा डाउनटाइम मॅनेज करणं यासह डाव सुरू असताना क्षणोक्षणी स्वतःला मॅनेज करणं, इथपर्यंतच्या सर्व लहानात लहान बाबींचा त्याने अभ्यास केला. आपण एका अपवादात्मकरित्या तयार असलेल्या प्रोफेशनल खेळाडूकडे पाहत आहोत”, असेही पॅडी उपटन यावेळी म्हणले.

Story img Loader