विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्वतयारीच्या दृष्टीने भारतीय हॉकी संघ ९ एप्रिलपासून युरोपियन दौऱ्यावर जात असून या संघात अनुभवी खेळाडू गुरबाज सिंग व दानिश मुजताबा यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र ड्रॅगफ्लिकर संदीप सिंगला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. सरदारासिंग याच्याकडेच भारताचे नेतृत्व राहणार आहे. ९ एप्रिलपासून भारताच्या दौऱ्याला प्रारंभ होईल. ११ एप्रिल रोजी भारताचा लीदेन येथे डच राष्ट्रीय संघाशी सामना होणार आहे. गुरिंदर सिंग, देविंदर वाल्मिकी व ललित उपाध्याय यांना प्रथमच भारताच्या वरिष्ठ संघात संधी मिळाली आहे.
भारतीय संघ :
गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश, हरज्योत सिंग.
बचाव फळी : बीरेंद्र लाक्रा, रुपींदरपाल सिंग (उपकर्णधार), व्ही. आर. रघुनाथ, कोठाजित सिंग, गुरिंदर सिंग, गुरबाज सिंग.
मध्यरक्षक : सरदारा सिंग (कर्णधार), एस. के. उथप्पा, धरमवीर सिंग, मनप्रित सिंग, चिंगलेनसाना सिंग, दानिश मुजताबा, देविंदर वाल्मिकी.
आघाडी फळी : एस. व्ही. सुनील, निक्किन थिमय्या, आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, युवराज वाल्मिकी, ललित उपाध्याय.