हॅमिल्टन अव्वल

धोकादायक वातावरणात झालेल्या जपानी ग्रां.प्रि. स्पर्धेविषयी उलटसुलट चर्चा रंगत असतानाच सोची, रशिया येथे झालेल्या रशियन ग्रां.प्रि. फॉम्र्युला वन शर्यतीत मर्सिडीझच्या ल्युइस हॅमिल्टनने बाजी मारली.

धोकादायक वातावरणात झालेल्या जपानी ग्रां.प्रि. स्पर्धेविषयी उलटसुलट चर्चा रंगत असतानाच सोची, रशिया येथे झालेल्या रशियन ग्रां.प्रि. फॉम्र्युला वन शर्यतीत मर्सिडीझच्या ल्युइस हॅमिल्टनने बाजी मारली. यंदाच्या हंगामातले हॅमिल्टनचे हे सलग चौथे जेतेपद आहे. २९वर्षीय हॅमिल्टनने पोल पोझिशनवरुन शर्यतीला सुरुवात केली. संघसहकारी निको रोसबर्गला १३.६५७ सेकंदांनी मागे टाकत हॅमिल्टनने अव्वल स्थान पटकावले. हॅमिल्टनचे हे कारकिर्दीतील नववे जेतेपद आहे. रोसबर्गने दुसरे तर विल्यम्सच्या फिन वलटॅरी बॉटसने तिसरे स्थान पटकावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hamilton wins first russian gp mercedes constructors title

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या