नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा भारताला संकटातून वाचवणाऱ्या हरभजन सिंगने अलीकडेच ओमानमध्ये अडचणीत सापडलेल्या भारतीय मुलीला वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न करून ती सुरक्षित मायदेशी परतेल याची काळजी घेतली. पंजाबमधील भंटिडा येथील २१ वर्षीय कमलजीत कौरला नोकरीच्या आमिषाने ओमानमध्ये चुकीने अडकवण्यात आले होते. कमलजीतचे पारपत्र, सिमकार्डही जप्त करण्यात आले होते.

हरभजनने हे समजल्यावर ओमानमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्यांना या सर्व प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर भारताचे राजदूत अमित नारंग यांनी राजकीय पातळीवर प्रयत्न करून त्या मुलीची सुटका केली.